
आता विदर्भावाद्यांची आंदोलन तीव्र करण्याची तयारी सुरु
_स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरीता विदर्भवाद्यांच्या आंदोलनाची मालिका_
_जा गे मारबत करत नागपूर करारचे २८/०९ ला दहन_
नागपूर: स्वतंत्र विदर्भ राज्याचे आंदोलन तीव्र करण्याच्या दृष्टीने नागपूर येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमेटी ची दि. ०८/०९/२०२२ रोजी अॅड. वामनराव चटप यांचे अध्यक्षतेखाली मुख्यालयी सर्व कोर कमेटी सदस्य, जिल्हा प्रमुख, जिल्हा समन्वयक विदर्भ राज्याची मागणी करण्या करीता ‘जा गे मारबत’ करत दि. २८/००९/२०२२ रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यात व तालुका मुख्यालयी कालबाह्य झालेल्या व विदर्भातील जनतेची फसवणूक करणाऱ्या नागपूर कार्ताराची होळी केली जाणार आहे असा निर्णय केला जाणार.
तसेच ०२ ऑक्टोबर गांधी जयंती दिनी जिल्ह्या-जिल्ह्यात व तालुक्यां-तालुक्यात कार्यकर्ते
गांधीजींचे बाबासाहेब आंबेडकरांचे, महात्मा फुलेंच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करतील व ०३/१०/२०२२ रोजी जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी, तहसीलदार यांचे मार्फत मा.ना.नरेंद्र मोदी पंतप्रधान भारत सरकार व अमित शहा यांचे कडे निवेदन पाठवून तत्काळ विदर्भाची निर्मिती करावी व ११७ वर्षे सुरू असलेली स्वतंत्र विदर्भाची मागणी कायमची निकाली काढावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात येणार आहे. तसेच सर्व ११ ही जिल्ह्यातील १० खासदारांना पत्र लिहून त्यांची विदर्भवांद्याची भूमिका काय ? हे जाहीरपणे स्पष्ट/जाहीर करावे असे कळविले जाईल व ११/११/२०२२ रोजी १० ही खासदारांचे एकाच दिवशी विदर्भाव स्वतंत्र राज्य देता की खुर्चीतून जाता अशी मागणी केली जाईल व एन.डी.ए.चे घटक नसलेल्या खासदारांना महाराष्ट्रवादी समजून “महाराष्ट्रावाद्यांनो विदर्भ सोडा” अशी मागणी केली जाईल व “तुझ्या भूजेत नाही वळ आता विदर्भ सोडून पळ” अशीही मागणी केली जाईल. अश्या वरील चारही आंदोलना बाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला.
काटेकोरपणे या आंदोलनाची अंबलबजावणी करण्याची व कोणत्याही परिस्थितीत मिशन २०२३ अंतर्गत आंदोलन तीव्र करून २०२३ संपेपर्यंत “शुरू हुई है जंग हमारी”, “लढेंगे जितेंगे”, “लाठी खाऊ गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून घेऊ” अशी शपथ घेतली. या बैठकीला संबोधित करताना विदर्भ आंदोलनाचे नेते अड. वामनराव चटप म्हणाले ‘शेंडी तुटो की पारंबी विदर्भ राज्य घेणारच’, ‘मिशन २०२३ च्या अंतर्गत विदर्भ मिळवू औंदा’ ज्या जुलमी कराराचे थातूर मातुर आश्वासने देऊन विदर्भाच्या जनतेची सतत फसवणूक करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला त्याची प्रतिक्रिया म्हणून नागपूर कराराचे प्रतीकात्मक दहन करण्यात येईल. ही जनतेच्या मनातली चीड त्यावेळच्या सरकारच्या विरोधात आजही आहे हे दर्शवते. या बैठकीत प्रकाश पोहरे म्हणाले की, या केंद्र सरकारला ऐशी तैशी करून विदर्भाचे राज्य देण्यास विदर्भाची जनता भाग पाडेल.
या बैठकीला प्रकाशभाऊ पोहरे, जेष्ठ संपादक, रंजनाताई मामर्डे, मुकेश मासुरकर, अरुणभाऊ
केदार, ॲड.मो.वी. टेन्शूर्डे, धनंजय धार्मिक, विष्णुपंत आष्टीकर, प्रभाकर कोंडबत्तुन्वार, सुयोग निलदावार, डॉ.रमेश गजबे, अविनाश काकडे, गुलाबराव धांडे, सौ. रेखाताई निमजे, सुधाताई पावडे, ज्योतीताई खांडेकर, शोभा येवले, विना भोयर, माधुरी चौहान, ॲड. सुरेश वानखेडे, कैलाश फाटे, राजेंद्र आगरकर, प्रकाश लढ्ढा, ॲड. रामभाऊ खराटे, कृष्णराव भोंगाडे, श्रीधर ढवस, कपिल इद्दे, रमेश नळे, रमेश राजूरकर, मोरेश्वर बोरकर, भगवान झंझाड, विनोद भाबरे, विजय जाधव, सुखदेव पात्रे, अतुल सतदेवे, वसंत गवळी, पंकज साबळे, राजेंद्र सिंग ठाकूर, राजकुमार झोटिंग, राजेंद्र सतई, गुणवंत सोमकुवर, राजीव म्हैसबडवे, ओमप्रकाश शाहू, मुळे, भूषण राउत, प्रशांत जयकुमार, विजय मौदेकर, जयंत चितळे हे उपस्थित होते.