नागपूरचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ..!
नागपूर: महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाची दहा दिवस विधीवत पूजा अर्चना व मनोभावे सेवा केल्यानंतर अखेर आज नागपूरचा राजाला निरोप देण्याची वेळ आली आहे.
नागपूरच्या राजाची मूर्ती रेशीमबाग परिसरातून मार्गस्थ झालेली आहे.नागपूरच्या राजाची मूर्ती शहरातील विविध चौकातून गणेश भक्तानां दर्शन देत ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मोठ्या उत्साहात नागपूर शहरापासून 20 किमी अंतरावर असलेल्या कोराडी येथील तलावामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला विधिवत पूजा अर्चना व आरती करत विसर्जित करण्यात येणार आहे.