निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनात सहभागी होणार

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनात सहभागी होणार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_20 सप्टेंबर रोजी विदर्भवाद्यांच्या बैठकीत प्रशांत किशोर हजेरी लावणार_

नागपूर: उपराजधानी नागपूर आणि अमरावती येथील विदर्भवाद्यांसोबत प्रशांत किशोर यांची झूम मीटिंग वर एक ऑनलाईन बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यात विदर्भवादी नेते प्रकाश पोहरे, माजी आमदार आशिष देशमुख यासोबतच अमरावतीचे नितीन मोहोळ नागपूरचे नितीन रोंगे आणि एडवोकेट मुकेश समर्थक सहभागी झाले होते.

प्रशांत किशोर हे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणी संदर्भात सकारात्मक असून त्यांनी विदर्भ राज्य आंदोलनाची सर्व माहिती घेऊन ते बैठकीला आले होते, असे या बैठकीत सहभागी झालेल्या विदर्भवादांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी काही विदर्भवाद्यांनी स्वतंत्र विदर्भ आंदोलनात मार्गदर्शन करण्यासाठी प्रशांत किशोर यांना विनंती केली होती. त्यानंतर त्यांनी 25 जणांची टीम पाठवत विदर्भातल्या सामाजिक, राजकीय , आर्थिक आणि इतर मुद्द्यांवर अभ्यास केला.

या अभ्यासातून विदर्भा सारखा समृद्ध भाग हा स्वतंत्र राज्य व्हावा असे प्रशांत किशोर यांना वाटत असल्याचे विदर्भवादी नेत्यांनी सांगितले. त्यामुळेच प्रशांत किशोर यांनी विदर्भवाद्यांना सहकार्य करण्याची तयारी दाखवली. या ऑनलाइन बैठकीत 20 सप्टेंबर रोजी विदर्भवाद्यांच्या बैठकीत स्वतः प्रशांत किशोर उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले. या बैठकीत स्वतंत्र विदर्भ राज्याचे आंदोलन, त्याचे पुढील स्वरुप आणि रणनीती कशी असेल यासंदर्भात चर्चा होणार आहे. या बैठकीत 250 लोकांना प्रशांत किशोर ट्रेनिंग देणार आहे असे विदर्भवादांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles