विविध प्रकारची बारा पुस्तके प्रकाशित; श्वेता कुलकर्णी यांचा अनोखा उपक्रम

विविध प्रकारची बारा पुस्तके प्रकाशित; श्वेता कुलकर्णी यांचा अनोखा उपक्रम



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, पुणे

पुणे : (प्रतिनिधी) येथील लेखिका व ब्लाॅगर श्वेता कुलकर्णी यांची विविध प्रकारची 12 पुस्तके एकाचवेळी नुकतीच प्रकाशित झाली असून हा अनोखा उपक्रम साहित्यक्षेत्राचे लक्ष वेधणारा ठरला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे श्वेताताईंनी हा सर्व लेखनप्रपंच कोरोना काळात केला असून हाती आलेल्या भरपूर वेळाचा सदुपयोग करून एक-दोन नव्हे तर तब्बल बारा पुस्तके लिहिल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

उत्तमनगर -वारजे येथे वास्तव्य असलेल्या श्वेता कुलकर्णी यांची ही पुस्तके कोल्हापूरच्या ‘नारायणी प्रकाशन’ या संस्थेने एकाच वेळी प्रकाशित केली असून हा मराठी प्रकाशन क्षेत्रातलाही अनोखा उपक्रम ठरतो आहे. प्रकाशित झालेली ही पुस्तके म्हणजे, ‘अवकाश’, ‘उत्सव’, ‘अल्बम’ या नावांचे कथासंग्रह. ‘त्रिमिती’, ‘ॠणानुबंधाच्या कुठून पडल्या गाठी’ या नावांचे दीर्घकथा संग्रह तसेच ‘बबन आणि मनी’ , ‘नाना-नानी आणि नॅनो’ या नावांचे विनोदी कथासंग्रह आणि ‘प्राक्तनफुले’, ‘नृत्यवर्षा’, ‘बिंब-प्रतिबिंब’, ‘दर्पण’, ‘स्टुडिओ’ या नावांच्या कादंबऱ्या असे हे विविध प्रकारचे साहित्य
मराठी साहित्य दालनात नव्याने दाखल झाले आहे.

यापूर्वी विविध दिवाळी अंकातून त्यांनी विपूल लेखन केले असून सातारा आकाशवाणीवर त्यांचे कार्यक्रम प्रसारित झाले आहेत.तसेच,त्यांना आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मूळच्या सातारा जिल्ह्यातील ओगलेवाडीच्या श्वेता कुलकर्णी मसूरच्या ‘गुंफण’ अकादमीच्या सदस्य आहेत. गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे, उपाध्यक्ष बबन पोतदार, सचिव गजानन चेणगे तसेच, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी श्वेताताईंचे विशेष अभिनंदन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles