दिवाळीच्या तोंडांवर खाद्यतेल होणार स्वस्त

दिवाळीच्या तोंडांवर खाद्यतेल होणार स्वस्त



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: महागाईने मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशात खाद्यतेलाच्या किंमती घसरण्याची शक्यता आहे. भारतात ऑगस्ट महिन्यामध्ये पामतेलाच्या आयातील 87 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर सप्टेंबर महिन्यात 10 लाख टन तेल आयात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या किंमती 40 टक्क्यांनी घसरल्या आहेत. पामतेलाची किंमत 1800-1900 डॉलर मेट्रिक टनवरून घसरून 1000-1100 डॉलर मेट्रिक टन वर पोहोचली आहे. देशातील तेलाची आयात वाढल्यानं येत्या काळात खाद्यतेलाच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे.

इतर खाद्यतेलापेक्षा पामतेल स्वस्त किमतीला उपलब्ध असल्याने तेल कंपन्यांनी अधिक पामतेल आयात केलं आहे. त्याचवेळी भारतात सणासुदीचा काळ आहे. काही दिवसांवर दिवाळी आहे. तसेच लग्नसराईचाही हंगाम येत आहे. अशा परिस्थितीत पामतेलाची मागणी वाढू शकते. त्यामुळे पामतेलाची आयात वाढली असून आगामी काळात खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles