वर्ल्डकपसाठी निवडलेल्या ‘या’ पाज जणांनी आस्ट्रेलियात पायही ठेवला नाही

वर्ल्डकपसाठी निवडलेल्या ‘या’ पाज जणांनी आस्ट्रेलियात पायही ठेवला नाही



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 15 सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्त्व मुंबईकर रोहित शर्मा करणार असून, उपकर्णधार म्हणून केएल राहुलची निवड करण्यात आली आहे. आशिया कपमध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे संघात काही बदल करण्यात आले आहेत. या संघात 5 असे खेळाडू आहेत ज्यांनी ऑस्ट्रेलियात आतापर्यंत एकही टी20 सामने खेळले नाहीत.

रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीत भारतीय संघात अक्षर पटेल याचा समावेश केला गेला आहे. सध्या तो भारतीय संघातील सर्वात अनुभवी अष्टपैलू म्हणून आपली जबाबदारी वाहिल. अक्षर मागील काही काळापासून भारतीय संघाचा नियमित सदस्य आहे. डावखुरी फिरकी गोलंदाजी आणि खालच्या क्रमांकावर आक्रमक फटकेबाजी करण्यास तो सक्षम आहे. आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत 26 टी20 सामने खेळलेल्या अक्षरने ऑस्ट्रेलियात एकही टी20 सामना खेळला नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर चार वनडे खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे.

संघातील दुसरा युवा अष्टपैलू दीपक हुडा हा देखील प्रथमच ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. यावर्षीच त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.‌ तो अद्याप ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याच प्रकारचे क्रिकेट खेळला नाही. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिल्यांदाच पाऊल ठेवेल.

उजव्या हाताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने 14 मार्च 2021 रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. दोन वर्षांच्या आपल्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, सूर्यकुमारने 28 सामने खेळले आहेत. त्याला ज्यावेळी खेळण्याची संधी मिळाली आहे, तिथे त्याची कामगिरी अप्रतिम राहिली. मात्र, उजव्या हाताचा फलंदाज अजूनही ऑस्ट्रेलियात पहिला T20I सामना खेळण्याची वाट पाहत आहे.

दुखापतीतून पुनरागमन करत असलेला वेगवान गोलंदाज हर्षल पटेल हा देखील पहिल्यांदाच भारतीय संघासह मोठी स्पर्धा खेळेल. या वर्षीय गोलंदाजाने आपल्या टी20 कारकिर्दीत 17 सामन्यांमध्ये 20.95 च्या सरासरीने 23 बळी घेतले आहेत. तो भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियात खेळेल. भारतीय संघातील सर्वात युवा खेळाडू अर्शदीप सिंग याने आपल्या कारकिर्दीत केवळ 11 टी20 सामने खेळलेत. यापूर्वी तो इंग्लंडमध्ये खेळला आहे. मात्र, ऑस्ट्रेलियात तो पहिल्यांदाच एखादी मालिका खेळेल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles