‘मिरवणुकीच्या सुंदर परंपरेची हेळसांड’: राहुल बोराटे

‘मिरवणुकीच्या सुंदर परंपरेची हेळसांड’: राहुल बोराटे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_पुण्यातील गणेशमंडळाचा युवा कार्यकर्ता_

अमृता खाकुर्डीकर, पुणे

पुणे: पुण्याची विसर्जन मिरवणूक पूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारी आहे. चॅनेलवर होणारं लाईव्ह प्रक्षेपण जगभर पाहिलं जातं. स्तुतीसुमनांची उधळण होत असलेल्या या मिरवणुकीला आता अलीकडे मात्र टीकेला तोंड द्यावे लागत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे कर्णकर्कश्शय दर्जाहीन गाणी आणि त्यावर कार्यर्त्यांचे बेफाम नाच.

मंडळांचे रेंगाळणारे रथ आणि तासनतास चालणारे ढोलवादन. मी स्वतः ढोलवादन करतो. ढोलाची थाप तालात पडली की रोमांच उभे राहतात.. पण आता मात्र ढोलवादनावर अर्थकारणाचा रंग चढलाय. गणेशवंदन आता श्रवणीय नसून प्रेक्षणीय झाले आहे, याचा खेद वाटतो. परंपरेची हेळसांड होताना बघून वाईट वाटते. पण या परिस्थितीत निराश होऊन उपयोग नाही. यातून सावरायला हवे, तलच काही चांगले घडवता येईल.

पुढच्या वर्षी माझ्या मंडळाचा गणेशोत्सव चांगला कसा सादर करता येईल याचा विचार मनाला उमेद देतो. आपल्या गणेशोत्सवाला काहीतरी ग्रहण लागलं आहे, पण हे ग्रहणही दूर करता येईल. जर शासन, प्रशासन, मिडिया आणि राजकारणी यांनी एकत्र येवून चांगला विचार केला आणि आम्हा युवकांना विश्वासात घेतले तर पुण्याची गणेशोत्सव परंपरा पुन्हा वैभवसंपन्न होईल. पुणे हे संस्कृतीचे माहेरघर आहे. आम्ही ही संस्कृति जपायला हवी. तरच लोकांना मिरवणूक त्रासदायक न वाटता आकर्षक वाटेल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles