नामवंत गझलकारांच्या मैफलीत रंगला मराठी मुशायरा

नामवंत गझलकारांच्या मैफलीत रंगला मराठी मुशायरा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, पुणे

पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि रयत शिक्षण संस्थेचे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल ‘रयतेचा हुंकार- गझल’ हा मराठी मुशायरा नामवंत गझलकारांच्या सहभागाने अतिशय रंगतदार झाला. कवयित्री बहिणाबाई चौधरी वाड्.मय मंडळ आणि स्नेहवर्धन प्रकाशन पुणे यांच्या सहकार्याने ही मैफल औंध येथील डाॅ. आंबेडकर महाविद्यालयाच्या कुसुमाग्रज काव्य कट्टा येथे आयोजित करण्यात आली होती.

“ऐका हो ते काय म्हणाले,
शुभ्र दुधाला साय म्हणाले”

या डाॅक्टर अविनाश सांगोलेकर यांच्या गझलेने श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले, तर
” आले न कुणी गेले न कुणी
चाहूल तुझी छळतेच कशी ”
ही दीपक करंदीकर यांची गझल रसिकांची विशेष दाद मिळवून गेली.

म.भा.चव्हाण,सुधीर कुबेर,सुहास घुमरे, रघुनाथ पाटील, मीना शिंदे धस अशा १५ नामवंत गझलकारांच्या सहभागाने मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. या रंगरंगलेल्या मुशाय-याचे बहारदार सूत्रसंचालन दिनेश भोसले यांनी केले. प्राचार्य डाॅक्टर अरूण आंधळे, डॉ स्नेहल तावरे प्रा.डाॅ. सविता पाटील, धनंजय भिसे हे मान्यवर मैफलीसाठी आवर्जुन उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles