केरळच्या रिक्षावाल्याने जिंकले लॉटरीचे तब्बल २५ कोटी

केरळच्या रिक्षावाल्याने जिंकले लॉटरीचे तब्बल २५ कोटी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

केरळ: शहरातील एका रिक्षाचालकाचे नशीब फळफळले आहे. कौन बनेगा करोडपतीमध्ये प्रश्नांची उत्तरे देऊन करोडपती बनलेले आपण पाहिले आहेत. पण केरळचा हा रिक्षाचालक अनूप ओणम बम्पर लॉटरीचे तिकीट जिंकला असून त्याला मिळालेली रक्कम आहे २५ कोटी.

अनूप हा मलेशियात शेफ म्हणून काम करण्यास जाणार होता. त्यासाठी त्याने ३ लाखांच्या कर्जासाठी अर्जही केला होता. हे तिकीट त्याने शनिवारी घेतले होते. तिकीट घेताना त्याने आधी एक तिकीट निवडले पण नंतर ते बदलून दुसरे घेतले. जे त्याच्यासाठी लकी ठरले.

बँकेत केलेल्या कर्जाच्या अर्जाबाबत तो म्हणाला की, आज मला बँकेत जायचे होते. बँकेने मला बोलावले होते पण मी त्यांना सांगितले की, मला आता त्याची गरज नाही. मी मलेशियालाही आता जाणार नाही. गेली २२ वर्षे अनूप लॉटरीचे तिकीट काढत आहे. त्यातून त्याने काहीशे रुपये जिंकलेही आहेत. जास्तीतजास्त ५ हजाराची लॉटरीही त्याला लागली आहे.

अनूप म्हणाला की, मला लॉटरी लागेल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. त्यामुळे टीव्हीवर याचे थेट प्रक्षेपण सुरू असताना मी पाहात नव्हतो पण मी जेव्हा मोबाईलवर पाहिले तेव्हा मी जिंकल्याचे दिसले. मला विश्वासच बसला नाही. मी माझ्या बायकोला तिकीट दाखवले. तिनेही सांगितले की, जे तिकीट काढले होते तोच तिकिटाचा क्रमांक आहे. तरीही माझ्या मनात प्रश्न होता. मग मी ज्यांच्याकडून लॉटरी घेतली त्या महिलेला फोन केला. तिनेही हाच लकी नंबर असल्याचे सांगितले.

आता या २५ कोटींपैकी करापोटी काही रक्कम कापली जाणार आहे. त्यामुळे अनूपच्या हाती १५ कोटी रुपये येणार आहेत. या पैशाचे काय करणार असे विचारल्यावर तो म्हणतो की, माझ्यावर जे काही कर्ज आहे ते सर्वप्रथम मी फेडणार आणि नंतर माझ्या कुटुंबासाठी एक चांगले घर बांधणार.

योगायोगाची गोष्ट म्हणजे गेल्यावर्षीही ओणम लॉटरी एका रिक्षावाल्यानेच जिंकली होती. त्यावेळी मात्र ती जिंकलेली रक्कम १२ कोटी होती. यावर्षी दुसरे बक्षीस ५ कोटींचे असून १० जणांनी १ कोटी जिंकले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles