वेदांता – फॉक्सकॉनकडे पैसे मागितले का? राज ठाकरेंचा सवाल

वेदांता – फॉक्सकॉनकडे पैसे मागितले का? राज ठाकरेंचा सवालपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

चेतन कळवते

नागपूर : वेदांता – फॉक्सकॉन मुळे सध्या राज्यात खूप गदारोळ सुरू आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या संदर्भात थेट प्रश्न विचारत राज्य शासनाला कोंडीत पकडले आहे. ” वेदांता-फॉक्सकॉनकडे पैसे मागितले का? नेमके फिस्कटले कुठे, महाराष्ट्रात आलेला उद्योग बाहेर का जातो,?” असा प्रश्न राज यांनी विचारला आहे.

राज्याच्या राजकारणात एवढा गोंधळ मी आजपर्यंत मी पाहिला नाही. कोण कुणाबरोबर जात आहे, कोण कुणासोबत सत्ता स्थापन करतेय हा गोंधळच आहे. मतदानाचा निकाल लागतो, लगेचच सकाळी शपथविधी होतो, मग ते फिस्कटत, त्यानंतर कुणीही कुणासोबत एकत्र येते त्यानंतर सत्ता जाते, अशी टीका राज यांनी केली, ते नागपूर येथे बोलत होते.

आपल्या नागपूर भेटी संदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले, “नागपूरची बऱ्याच वर्षांची झाडाझडती बाकी होती. पदाधिकाऱ्यांशी बोलणे झाले. नागपूरमधील सर्व पदे आणि प्रमुखांची पदे बरखास्त करीत आहे, नवीन लोकांना संधी मिळणार आहे. मुंबईत 27 सप्टेंबरला पक्षाची बैठक आहे त्यानंतर पदाधिकारी मुंबईहून नागपूरात येऊन पक्षबांधणी करतील. कोल्हापूरनंतर कोकणात त्यानंतर मी परत नागपूरला येईल. पक्षबांधणीवर मी लक्ष देणार आहे.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles