वरीष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर यांचे निधन
अमृता खाकुर्डीकर, पुणे
पुणे. (प्रतिनिधी) – वरीष्ठ पत्रकार, खवैय्या फूड ब्लॉगर, आशिष चांदोरकर यांचे आज पुणे येथे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. मित्र परिवारात आणि वाचकांमध्ये लोकप्रिय असलेले आशिष चांदोरकर यांनी वृत्तपत्र आणि ब्लाॅगच्या माध्यमातून विविध विषयांवर विश्लेषणात्मक विपुल लेखन केले होते. विशेषतः पुण्याच्या विकासाबाबत त्यांनी नेहमीच सडेतोड भूमिका मांडली. त्यांचा फूड ब्लॉग कमालीचा लोकप्रिय होता.
खवय्यांसाठी खाण्याचे नवनवीन ठेले तर त्यांनी परिचित करून दिलेच, पण एखाद्या पदार्थाचे वर्णन ते अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने करीत असत आणि खाद्यसंस्कृतीचा रसभरीत इतिहास लिहीताना त्यांची लेखणी बहारदार होत असे. अवघ्या 44 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या या अवलियाच्या निधनामुळे पत्रकार आणि मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे.
मा. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून आशीष या॔च्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !