CT-1 नरभक्षक ‘वाघोबा’चे भक्षण सुरूच, वनविभागावर प्रश्नचिन्ह

CT-1 नरभक्षक ‘वाघोबा’चे भक्षण सुरूच, वनविभागावर प्रश्नचिन्ह



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रा. तारका रूखमोडे, प्रतिनिधी

गोंदिया: जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव तालुक्यात CT-1 नावाच्या पट्टेदार नरभक्षी वाघ गेल्या पंधरा दिवसांपासून अर्जुनी मोरगाव वनपट्ट्यात नर बळी घेतो आहे. मागच्याच आठवड्यात अरूणनगर येथील इसमाचा बळी घेतला. ती भीती मनातून जाते न जाते, तोच पुन्हा काल दि ३ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळच्या सुमारास कन्हाळगाव येथील शेतावर गेलेल्या इसमावर झडप घालून त्याला दूर ओढत नेऊन त्याचे भक्षण केले.

अर्जुनी मोरगाव ,इटखेडा, वडेगाव, भुयार खामखुरा व माहूरकुडा या भागात तो दृष्टोत्पत्तीस पडत असल्याने सर्वत्र भयानक भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांना जंगलात व शेतावर न जाण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
अगदी मागच्याच आठवड्यात याच CT-1 वाघाने अरुण नगर येथील इसमास ठार केले होते.तत्पूर्वी कोंढाळा येथील दोन इसमास ठार व दोघांवर हल्ला केला होता. चारायला नेलेल्या गुरांवरही हल्ले केलेत.

गेल्या आठ दिवसांपासून हा वाघ पुयार महागाव ते अर्जुनी एवढ्याच भागात फिरत आहे. वडसा गोंदिया महामार्ग व माहूरकुड्याच्या रस्त्यावर आजही सकाळच्या सुमारास हा मॅन इटर दिसला. वनविभाग सकाळ संध्याकाळी परिसरात फिरणे टाळावे अशा सूचना जनहितार्थ जारी करतो आहे .पण या वाघाला स्पष्ट लोकेशन मिळूनही जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश का येतो आहे? वनविभागाच्या या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभा झालेला आहे ..वाघाला जेरबंद करण्यासाठी त्याच्या शोध मोहिमेत वनविभाग कुठे कमी पडतो आहे. ड्रोनच्या साह्याने व इतर शोधमोहीम साहाय्याने वन विभागाने लवकरात लवकर या वाघाला पकडले नाही तर येणाऱ्या आठवड्यात पुन्हा कित्येकांचे जीव जातील हे सांगता येत नाही.

आज दुपारी सुद्धा तो इटखेडा ते माहूरकुडा या रस्त्यावर सकाळी अपडाऊन करणाऱ्या दुचाकी व चारचाकी स्वारांच्या दृष्टोत्पत्तीस पडला. व एका दुचाकी स्वारावर झडप घेण्याचा प्रयत्नही केला पण थोडक्यात निभावले .इतक्या स्पष्टपणे त्याच्या फिरण्याच्या जागा जनास माहीत झाल्या तरी सुद्धा वनविभाग ठोस पावलं उचलून त्याला जेरबंद का करीत नाहीये हा मोठा प्रश्न सर्व लोकांना पडतो आहे. अर्जुनी/मोरगाव या पट्ट्यामध्ये 90 टक्के शेतकरी राहतात व कामगार समाज राहतो त्यांना कामासाठी व शेतावर देखरेख ठेवण्यासाठी बाहेर जावंच लागतं.

कित्येक विद्यार्थी गावात काॅलेजची सुविधा नसल्याने सायकलने अर्जुनीला शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून वन विभागाच्या प्रशासनाने यात जातीने लक्ष घालून अत्याधुनिक साधनांच्या साहाय्याने व ड्रोनच्या साह्याने या नरभक्षकाला जेरबंद करावे अशी लोकांची वनविभागाला सूचनावजा विनंती आहे .

भीतीचे दहशतीचे वातावरण सर्वत्र निर्माण झाले असतानाच रात्री नऊ वाजेच्या सुमारास भयानक मोठा दुसरा पट्टेदार वाघ अर्जुनी साकोली मार्गावरील निमगाव फाट्यावर अगदी कडेला उभा असलेला दुचाकीस्वारांना दिसला. त्यामुळे अर्जुनीला चहुबाजूने वाघांनी घेरलेलं असल्यामुळे एकटे कुणीही कालपासून घराबाहेर पडायची हिंमत करीत नाहीत..म्हणून वनविभागाने तातडीने अॅक्शन घेणं गरजेचं झालं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles