न्यू मून इंग्लिश मिडीयम शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात

न्यू मून इंग्लिश मिडीयम शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रा. तारका रूखमोडे, प्रतिनिधी

गोंदिया: न्यू मून इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज अर्जुनी/मोर.येथे दोन ऑक्टोंबर रविवारी संस्था सचिव श्री ओमप्रकाशसिंह पवार व प्राचार्य श्री सचिन मेश्राम यांच्या उपस्थितीत भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान ,स्वातंत्र्यसेनानी लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

अध्यापिका कुंजना बडवाईक यांनी महात्मा गांधी व हिना लांजेवार यांनी लालबहादूर शास्त्री यांची माहिती सांगितली व प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले संस्था सचिव ओमप्रकाशसिंह पवार यांनी या महान नेत्यांच्या जीवनावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला व या महान नेत्यांच्या कर्तृत्वाच्या स्मरणस्वरूपात विविध उपक्रम प्रत्यक्ष कृतीतून शाळेत उतरावे व विद्यार्थ्यांना भावी दिशा दाखवावी हेच खरं स्मरण ठरेल हीच खरी आदरांजली ठरेल असेही मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक राकेश उंदीरवाडे, प्राध्यापिका तारका रुखमोडे, अध्यापक श्री बांडे , लिना चचाणे, त्रिवेणी थेर ,प्रतीक्षा राऊत,शिला बोरीकर, यांनी परिश्रम घेतले. व यानिमित्ताने शाळा स्वच्छता व परिसर स्वच्छता व गांधी टोपी बनवणे हे उपक्रम राबवले गेले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles