“प्रा.राकेश उंदीरवाडे” यांच्या ‘धिमंत’ कोचिंग क्लासेसचा स्तुत्य उपक्रम

“प्रा.राकेश उंदीरवाडे” यांच्या ‘धिमंत’ कोचिंग क्लासेसचा स्तुत्य उपक्रम



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रा. तारका रूखमोडे, प्रतिनिधी

गोंदिया: आदिवासी भाग असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील ‘डीसीए’ म्हणजेच धिमंत कोचिंग क्लासेसचे मुख्य संचालक राकेश उंदीरवाडे हे गेल्या काही वर्षापासून विज्ञान विषयाचे कोचिंग क्लास चालवतात. होतकरू व गरजू विद्यार्थी येथे अत्यंत कमी शुल्कात उच्च प्रतीचे कोचिंग शिक्षण घेत आहेत.

दोन ऑक्टोबर रविवार गांधी जयंतीचे औचित्य साधून अकादमीतील विद्यार्थ्यांनी प्रा.उंदिरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी हजाराहून जास्तच कागदी पॉकेट बनवून अर्जुनी मोरगाव येथील स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना औषध वितरणासाठी तेथील डाॅक्टरांना भेट दिली.

प्रत्येक रविवारी ही अकॅडमी विविध उपक्रम करत असते व समाजाभिमुख कार्य देखील करत असते. शैक्षणिक अकॅडमीचे प्रमुख प्रा. राकेश उंदीरवाडे हे रुग्णांच्या सेवेसाठी पुढेही असेच ‘कागदी पाकीट’ या ग्रामीण रुग्णालयाला अविरत पुरवणार आहेत. हा त्यांचा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि वाखाणण्याजोगा आहे. प्रा. उंदीरवाडे हे ‘न्यू मून’ इंग्लिश मिडीयम ज्युनियर काॅलेज येथे प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles