स्त्रीशक्तीचा वापर युक्तीने करणा-या महिलांचा गौरव

स्त्रीशक्तीचा वापर युक्तीने करणा-या महिलांचा गौरव



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_’ती’चा सन्मान कार्यक्रम संपन्न_

अमृता खाकुर्डीकर, पुणे

पुणे: नवरात्र शारदीय महोत्सवाच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचा वापर युक्तीने करणा-या महिलांचा गौरव करणारा ” तिचा सन्मान” हा विशेष कार्यक्रम नवयुग मित्रमंडळ व महिला मंडळाने आयोजित करून विविध क्षेत्रातील महिलांचा समारंभपूर्वक सन्मान सोहळा साजरा केला.

दिवाणी न्यायालयात वरीष्ठ न्यायाधिश पदी असलेल्या सौ. सुप्रिया विजयसिंह निकम, कोरोना योध्दा डाॅ. देवयानी गावंडे, डाॅ. तेजस्विनी पाठक, सहाय्यक आरोग्य निरीक्षक कविता खरात सिसलीकर, तसेच नोंदणी व मुद्रांक विभागातील सहायक लेखा अधिकारी सौ.माधुरी मिलिंद शिंदे, उद्योजिका-सौ मनिषा सचिन चव्हाण – आणि सहा. पोलीस आयुक्त – आरती भागवत बनसोडे व लहान मुलांचा बौध्दीक विकास या क्षेत्रात काम करणा-या श्रीमती मोनिका डिसुझा अशा विविध क्षेत्रातील या कर्तृत्ववान नवदुर्गांचा शाल , श्रीफळ- पुष्पगुच्छ, आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष सुमित फुले, महिलामंडळाच्या अध्यक्षा सौ.शैला पवार यांच्यासह सौ. दौंडकर, सौ. तारू, सौ. फडतरे, यांच्या शुभहस्ते हे सत्कार संपन्न झाले.

गोखलेनगर येथील निलज्योती सोसायटीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सर्व सन्मान प्राप्त महिलांनी आपले दिलखुलास मनोगत व्यक्त केले. स्त्रीशक्तीचा वापर आपण आपल्या कार्यात कसा युक्तीने करतो आणि समोर आलेल्या आव्हानांना कसे धीराने सामोरे जातो याबद्दलचे त्यांचे अनुभवकथन श्रोत्यांना प्रेरणा देऊन गेले. सदर महिलांना मुलाखतीतून काही प्रश्न विचारून बोलते करण्याचे काम व कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ.अमृता खाकुर्डीकर आणि प्रशांत गायकवाड यांनी केले.

मंडळाचे हर्षल कांबळे , गणेश दौंडकर, आनंद कारवा, संकेत लामखेडे, राहुल बोराटे, ई. कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले. परिसरातील प्रतिष्ठीत मान्यवर नागरिक व महिलांनी कार्यक्रमास गर्दी केली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles