“स्वच्छ”चे कार्य समाजासाठी अत्यावश्यक; वंदना चव्हाण

“स्वच्छ”चे कार्य समाजासाठी अत्यावश्यक; वंदना चव्हाण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_संस्थेचा वर्धापन दिन समारंभ_

अमृता खाकुर्डीकर, पुणे (प्रतिनिधी)

पुणे: गेली 15 वर्ष पुणे शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवणा-या ‘ स्वच्छ सेवा सहकारी संस्थे’ चे कार्य समाजासाठी आत्यावश्यक असून शहराचे आरोग्य सांभाळणा-या आणि सौंदर्य जपणा-या या संस्थेचे काम फार मोलाचे आहे अशा शब्दात स्वच्छ संस्थेचा गौरव करून खासदार . वंदना चव्हाण यांनी संस्थेला पूढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचा 15 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. गणेश कला क्रीडा केंद्रात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव होते.

यावेळी पुणे महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत आणि समाज विकास विभागाच्या उपायुक्त रंजना घगे यांनी ‘ स्वच्छ ‘ संस्थेच्या माध्यमातून पुणे महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या घनकचरा व्यवस्थापन कार्यवाहीची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबा आढाव यांनी उपस्थितांशी अनौपचारिक संवाद साधला तसेच संस्थेचे कार्यकर्त्यांच्या कामाची प्रशंसा केली.

नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांचा संस्थेला करीत असलेल्या सहकार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी माधुरीताईंनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. ‘स्वच्छ’ संस्थेच्या सदस्य लक्ष्मी नारायण यांनी प्रास्ताविक केले तर *हर्षद बर्डे* यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विविध मान्यवरांसह ‘स्वच्छ’ चे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles