‘उत्सव पुस्तकांचा’ प्रदर्शनास वाचकांचा उदंड प्रतिसाद

‘उत्सव पुस्तकांचा’ प्रदर्शनास वाचकांचा उदंड प्रतिसाद



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, पुणे

पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस
आयोजित महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरू असलेल्या ‘उत्सव पुस्तकांचा २०२२’ ह्या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून ‘महासम्राट’ या छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारीत कादंबरीला सर्वत्र महा प्रचंड मागणी आहे.

वाचकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मेहता पब्लिशिंगच्या पुस्तक दालनात एक विशेष उपक्रम राबवण्यात आला. ‘महासम्राट’ ही कादंबरी लेखकाच्या स्वाक्षरीसह उपलब्ध करून देण्याची संधी आणि सोबत विश्वास पाटील यांच्याशी संवाद असे कार्यक्रमाचे स्वरूप ठेवल्यामुळे अनेक वाचकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, इतिहासाचे अभ्यासक, विद्यार्थी आणि ऐतिहासिक लेखन करणारे नवे-जुने लेखक यांनी विश्वास पाटील यांची भेट घेऊन कादंबरीवर विस्तृत चर्चा केली.

यावेळी श्रोत्यांशी मनमोकळा संवाद साधताना कादंबरीकार विश्वास पाटील म्हणाले, ” धर्म, राजकारण आणि स्वराज्यनिर्मितीच्या अलीकडे असलेला; छत्रपती शिवरायांचा कुटुंब वत्सल दृष्टिकोन महासम्राट मधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ यात वाचकांसोर उलगडत जातो.शहाजी राजे, माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नात्यातील भावनिक बंधाचे दर्शन प्रथमच या कादंबरीतून वाचकांना होत आहे. तसेच आजवरच्या उपलब्ध साहित्यात पहिल्यांदाच शहाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रसंग तपशीलाना समोर येणार असून हे अनोखे शब्दचित्र वाचकांना आकर्षित करीत आहे.”

“महाकादंबरीकार विश्वास पाटील यांचा अभ्यास आणि इतिहास जिवंत करणाऱ्या शब्दकळेमुळे ‘महासम्राट’ चे चर्चा सर्वत्र असून या ऐतिहासिक कादंबरीने सध्या वाचकांच्या मनात वेगळं स्थान मिळवले असल्याने त्यांचा भरघोस प्रतिसाद कादंबरी खरेदीस लाभत आहे” अशी माहिती मेहता पब्लिशिंग हाऊसचे अखिल मेहता यांनी दिली. प्रदर्शनात रसिक वाचक उत्साहाने विविध पुस्तकांची खरेदी करीत असल्याचे सुखद चित्र दिसत होते. लेखकाची स्वाक्षरी पुस्तकावर घेण्यातही लोकांचा उत्साह दिसत होता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles