कॅनरा बँक सेवानिवृत्त अधिकारी संघटनेचा “मुक्तछंद” दिवाळीअंक प्रकाशित

कॅनरा बँक सेवानिवृत्त अधिकारी संघटनेचा “मुक्तछंद” दिवाळीअंक प्रकाशित



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, पुणे

पुणे: कॅनरा बँकेच्या सेवानिवृत्त अधिकारी संघटनेच्यावतीने दरवर्षी सिध्द करण्यात येणारा दिवाळी अंक “मुक्तछंद” नुकताच प्रकाशित झाला असून अंकाचे हे तिसरे वर्ष आहे. प्रसिध्द लेखक आणि संगणक तज्ञ श्री. दीपक शिकारपूर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. कॅनेरा बँक अधिकारी संघटनेचे श्री. एच एम डी कामथ यांनी अध्यक्षस्थान भूषविले. त्यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन संपन्न झाले. यावळी व्यासपीठावर सर्वश्री. रविंद्र वाली , प्रदीप जैन हे कॅनरा बँक सेवानिवृत्त अधिकारी संघटनेचे पदाधिकारी, तसेच अंकाचे संपादक श्री. मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.

कोथरूड येथील ‘स्वामी कृपा’ सभागृहात झालेल्या या कार्यकामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आला. सुरुवातीला सौ.सुजाता देशपांडे यांनी गणेश वंदना सादर केली.
श्री.सुरेश शेठ यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे श्री.दीपक शिकारपूर यांनी आपल्या भाषणात त्यांना भेटलेल्या दिग्गजांचे मनोरंजक किस्से सांगितले आणि ‘ मुक्तछंद ‘ दिवाळीअंकाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

श्री.मुकुंद कुलकर्णी यांनी संपादकीय भूमिका मांडली. या प्रसंगी श्री.दीपक शिकारपूर यांच्या हस्ते कॅनबॅंक फॅमिली सदस्यांना सन्मानचिन्ह प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अजय मुटाटकर यांनी केले. रवींद्र बगळे यांनी आभार मानले. सौ.मानसी कुलकर्णी यांच्या पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles