टीम इंडीयाचा विजयी अभिमान कायम; नेदरलँडचा ५६ धावांनी पराभव

टीम इंडीयाचा विजयी अभिमान कायम; नेदरलँडचा ५६ धावांनी पराभव



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नवी दिल्ली : आज T20 विश्वचषक 2022 चा 23 वा सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात भारताने नेदरलँड्सवर 56 धावांनी दणदणीत विजय मिळवला. आज कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान आजच्या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने नेदरलँड्सला 180 धावांचे लक्ष दिले. रोहित शर्मा, विराट कोहली यांनी अर्धशतके झळकावले.

*भारताचा खेळ*

आज टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. उपकर्णधार केएल राहुल तिसऱ्या षटकात केवळ 9 धावा काढून पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे पॅव्हेलियनमध्ये परतला. नेदरलँडच्या गोलंदाजांनी पहिल्या 6 षटकांत आपली पकड घट्ट केली आहे. पॉवरप्लेमध्ये भारताने 1 गडी गमावून 32 धावा केल्या होत्या. भारताने 9व्या षटकात 50 धावा पूर्ण केल्या. 10 षटकांत भारताने 1 गडी गमावून 67 धावा केल्या. रोहित आणि कोहली यांच्यातील अर्धशतकी भागीदारीही याच काळात पूर्ण झाली.

रोहित शर्मानेही वेग पकडत 35 चेंडूत 29 वे अर्धशतक झळकावले, तो 53 धावा करून क्लासेनचा बळी ठरला. त्यानंतर कोहली आणि सूर्यकुमार यादवने धावसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले.सूर्यकुमार यादवने 95 धावांची भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. विराट कोहलीने 37 चेंडूत अर्धशतक ठोकले. तर डावाच्या शेवटच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने षटकार ठोकला आणि 25 चेंडूत 51 धावा केल्या. कोहली 62 धावांवर नाबाद राहिला. अशाप्रकारे भारताने 2 बाद 179 धावा केल्या. नेदरलँड्ससमोर आता 180 धावांचे लक्ष आहे.

*नेदरलँड्सचा खेळ*

180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड संघाला तिसऱ्या षटकात 11 धावांवर पहिला धक्का बसला. भुवनेश्वर कुमारने विक्रमजीत सिंगला क्लीन बोल्ड केले. पाचव्या षटकात 20 धावांवर नेदरलँड्सला दुसरा धक्का बसला. अक्षर पटेलने मॅक्स ओडला क्लीन बोल्ड केले. यानंतर पुढे 10व्या षटकात 47 धावांवर नेदरलँड्सला तिसरा धक्का बसला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles