मनसे शहर दक्षिण पश्चिम विभाग अध्यक्षपदी तुषार गिऱ्हे
नागपूर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने नागपूर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण पश्चिम विभागातील विभाग अध्यक्ष या पदावर तुषार गिऱ्हे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांनी नियुक्तीपत्र दिले.
तसेच संदीपभाऊ देशपांडे, अविनाश जाधव व सहचिटणीस हेंमत गडकरी यांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहर चे दोन्ही नवनियुक्त शहराध्यक्ष यांच्या मार्गदर्शना खाली ही नियुक्ती करण्यात आली. शहराध्यक्ष चंदू लाडे व विशाल बडगे यांनी पुढील वाटचालीस नवनियुक्त विभाग अध्यक्ष दक्षिण पश्चिम तुषार गिऱ्हे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.