मराठी भाषेची श्रीमंती अधिकाधिक वाढीस लागेल; नरेंद्र काळे

मराठी भाषेची श्रीमंती अधिकाधिक वाढीस लागेल; नरेंद्र काळे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_’जिवलग’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन_

नागपूर: ‘आम्ही युवा’ या सामाजिक संघटनेतर्फे पहिला वहिला दिवाळी अंक मराठीचे शिलेदार प्रकाशनाच्या सहकार्याने ‘जिवलग’ चा २९ ऑक्टोबर , २०२२ रोजी बाबुराव धनवटे हॉल , व्होक्हार्ट हॉस्पिटल जवळ, शंकरनगर येथे प्रकाशन सोहळा थाटात संपन्न झाला. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना मुंबईहून या समारंभास आलेले नरेंद्र काळे यांनी आपली मराठी भाषा ही मातृभाषा असून तिचे संवर्धन, संरक्षण करणे ही मराठी माणसांचे आद्यकर्तव्य असल्याचे म्हणाले, तसेच ‘आम्ही युवा’ने आपल्या पहिल्याच अंकातून मराठी भाषेला न्याय देण्याचा केलेला प्रयत्न हा नक्कीच मराठी भाषेची श्रीमंती वाढविण्यासाठी केलेला यशस्वी प्रयत्न आहे. ते पुढे म्हणाले की, अशा प्रकारच्या उपक्रमाने मराठी वाचन संस्कृती वाढीस लागेल यात शंका नाही.

‘जिवलग’ दिवाळी अंकांच्या प्रकाशन समारंभास मा.गिरीश गांधी, प्यारे खान, राजेश चिटणीस, मुख्य संपादक शाम पेठकर उपस्थित होते. याप्रसंगी विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून युवा मंच या संकल्पाने अंतर्गत एकत्र आलेले महाविद्यालयीन विद्यार्थी आजही तितकेच एकजिनसीपणाने बांधले गेले आहेत. आम्ही युवा म्हणून आम्ही जिवलग हे आमचे मुखपत्र या दिवाळीपासून सुरू करत असल्याचे शाम पेठकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. या अंकाची संकल्पना आम्ही युवाचे क्षितीज इंगळे यांनी सर्वप्रथम मांडली होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. अंशुजा किंमतकर यांनी केले,तर आभार राजेश टिकले यांनी मानले.

आयोजित प्रकाशन समारंभास ‘आम्ही युवा’चे चेतन कवळते, प्रणाली राऊत, नंदू लुचे, विकास चौरे, डॉ आशीष उजवणे, प्रवीण मुधोळकर, ज्ञानेश्वर पवार, योगेश देशमुख, डॉ अतुल ठाकरे, रोशन माथुरकर, सुषमा ओझा, किशोर धांदरे, संदिप बाळबुधे, किरण मोखारे, राहुल कांबळे, मनीष दांडेकर, प्रभूदास रामटेके आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles