
‘साहित्यगंध’ प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षपदी सविता पाटील ठाकरे, तर कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी शर्मिला देशमुख
नागपूर: नागपूर येथील नामांकित व मराठी भाषा सक्षमीकरणासाठी अहोरात्र मागील आठ वर्षापासून यशस्वीपणे कार्य करीत असलेल्या ‘मराठीचे शिलेदार’ बहुउद्देशीय व प्रकाशन संस्थेच्या यंदाचा ‘साहित्यगंध दीपोत्सव २०२२’ या दिवाळी अंकाचा प्रकाशन समारंभ, पुरस्कार वितरण व राज्यस्तरीय काव्यसंमेलन आता भालचंद्र रक्तपेढी, रेडक्रॉस भवन सभागृह, गांधी मार्केट, मध्यवर्ती बस स्थानक, लातूर येथे दि ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० ते ७.३० पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
प्रकाशन समारंभ व पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवमती सविता पाटील ठाकरे, प्रदेशाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड, सिलवासा, दादरा नगर हवेली या असतील, तर राज्यस्तरीय कवी संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून प्रसिद्धी कवयित्री व लेखिका शर्मिला देशमुख, बीड तसेच उद्घाटक मा.संजयभाऊ बनसोडे,माजी गृहराज्यमंत्री,महाराष्ट्र राज्य, प्रमुख अतिथी मा.डाॕ.सुनिल गायकवाड, माजी खासदार, लातूर, मार्गदर्शक माजी प्राचार्य डाॕ.माधव गादेकर, ज्येष्ठ साहित्यिक, लातूर, मार्गदर्शक मा.सुधाकर भुरके, नागपूर, प्रमुख अतिथी मा. नरेश शेळके, बुलढाणा व दुस-या सत्रात प्रमुख अतिथी मा.धम्मपाल अनिल खंडागळे, डायरेक्टर (सॕटेलाईट फायनान्स) मिनिस्ट्री आॕफ कम्युनिकेशन, भारत सरकार, खासदार मा.सुधाकर श्रृंगारे, मार्गदर्शक मा.प्रदिप ढगे, प्रसिद्ध शिवव्याख्याते,उदगीर, प्रमुख पाहुणे मा. नागोराव कोम्पलवार, ज्येष्ठ कवी, यवतमाळ उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी राज्यातील ९० कवी, कवयित्री व लेखकांना साहित्यगंध पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, राज्यातील व राज्याबाहेरील निवडक ३३ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच आपले आयुष्य शिक्षणासाठी वाहिलेल्या पाच मान्यवरांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय प्रकाशन समारंभास राज्यातील विविध भागातील लेखक, कवी व साहित्यिक हजेरी लावणार आहेत. लातूरकरांसाठी ही दीपावलीनिमित्त साहित्याची पर्वणी असल्याने या समारंभास आवर्जून उपस्थित राहावे. याप्रसंगी मराठीचे शिलेदार प्रकाशनाचे प्रसिद्ध व निवडक कवितासंग्रह सवलतीच्या दरात उपलब्ध असणार आहे. आयोजित राज्यस्तरीय कवी संमेलनात तब्बल ५५ निमंत्रित कवी कवयित्री आपल्या दर्जेदार रचना सादर करणार असल्याचे, मराठीचे शिलेदार संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी सांगितले.
मराठीचे शिलेदार प्रकाशनाच्या वतीने लातूर येथील भालचंद्र रक्तपेढी सभागृहात दि ३ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या ‘साहित्यगंध दीपोत्सव २०२२’ दिवाळी अंकाच्या प्रकाशनानंतर सर्व मराठी भाषिक वाचक व साहित्यिकांना साहित्यगंध अंकाचा अनमोल साहित्य ठेवा हा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. १०० रू प्रती अंक सवलतीचा दर असेल या संधीचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा जेणेकरून कुटुंबातील प्रत्येकाच्या घरातील बच्चेकंपनींची वाचन संस्कृती वाढीस लागेल. करिता आपण ‘मुख्य सहसंपादक वैशाली अंड्रस्कर’ यांच्याकडे प्रकाशनपूर्व नोंदणी करू शकता.