साहित्यगंध दीपोत्सव प्रकाशन समारंभाचा मी एक साक्षीदार

साहित्यगंध दीपोत्सव प्रकाशन समारंभाचा मी एक साक्षीदार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गणेश वि. कुंभारे, ब्रम्हपुरी

लातूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील सर आपण मराठी भाषा संवर्धनात मौलिक कार्याचा वसा चालवीत आहात, ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे. नुकताच लातूर येथे आयोजिलेल्या साहित्य सोहळ्यात अनेक अंगांना स्पर्श करून साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक मूल्ये जोपासलेले प्रत्यक्षदर्शी मला पाहता आले. मी याचा एक साक्षिदार आहे. वेगवेगळ्या दालनात जाऊन बरंच काही शिकणे आणि ते अंगिकारणे, नव्हे ती साकार करण्यासाठी धडपडणे, ही मानसिकता फार महत्त्वाची असते. ब-याच वर्षापासूनच्या चाललेल्या या प्रयत्नातून निश्चितच काही दृश्य तर काही अदृश्य रुपात साहित्यिक निपजले असणार, निश्चितच काही नवोदित असतील. दर मजल करीत सर्वांमध्ये सद् गुणांची चेतना जागविण्याची आणि ती अबाधित ठेवण्याची आपली कामगिरी दिव्यत्वाची प्रचिती आणणारी आहे.
मला आपल्या माध्यमातून माझ्या अनुभवादाखल एक पुस्तक मुद्रित करून ते प्रकाशित करता आले, हा एक ठेवा मला स्मरणात राहिल, यात शंका नाही. फार चांगला आणि मोठा परिवार तयार करून त्याचे नेतृत्व आपण करीत आहात, हे कसब काहींनाच जमते. हे ही एक कौशल्य आहे. जे आपण बाळगून आहात.
आपला सहवास, आपले सहकार्य मला लाभले, याबद्दल मी आपला ॠणी आहे.
आपल्या पुढील समाजहिताच्या चांगल्या कार्यास माझ्या शुभेच्छा आहेच. धन्यवाद.

गणेश वि. कुंभारे
सहसंपादक
जीवन गौरव मासिक म.रा.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles