‘गुंजन मनीचे’ काव्यसंग्रह प्रकाशन समारंभानंतरचे मनोगत ‘वसुधा’चे

‘गुंजन मनीचे’ काव्यसंग्रह प्रकाशन समारंभानंतरचे मनोगत ‘वसुधा’चे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वसुधा नाईक, पुणे

पुणे: ‘मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर ‘ या संस्थेची म्हणजेच संस्थापक श्री. माननीय श्री राहूल सर यांच्याशी मी गेली जवळ जवळ सहा वर्ष जोडली गेलेली आहे .तर यावर्षी ‘साहित्य गंध’ पुरस्कार हा जाहीर झाला आणि ‘साहित्य गंध दीपोत्सव’ २०२२ या दिवाळी अंकाचे प्रकाशन ठरले .दिनांक होती सहा नोव्हेंबर सहाला मला एक वेगळा कार्यक्रम होता. त्यामुळे जरा असं झालं इकडे जाऊ का तिकडे जाऊ ?मग काय करावं? हा प्रश्न पडला संग्राम सरांचा फोन आला, आपल्याला कार्यक्रमाला यायचे आहे. लातूरला कार्यक्रम आहे. मी म्हटले मला पुण्यात एके ठिकाणी जायच आहे.सर म्हणाले ‘नाही आधी इकडे यायचं बर!’

त्यात माझा काव्यसंग्रह ‘गुंजन मनीचे’ याची दुसरी आवृत्ती मी सरांकडे जवळजवळ दोन महिन्यांपूर्वी टाकलेली होती .प्रकाशन करायचे की पुस्तकं पुण्याला पाठवायची, हा एक संभ्रमच होता .कारण याच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन नागपूर मध्येच मा. राहुल सर, सविताताई, संग्राम सर, वैशालीताई , उरकुडे सर, अशोक सर, असे बऱ्याच जणांच्या साक्षीनं मराठ्यांच्या मराठी माझ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मोठ्या थाटामाटात झाले होते. त्यावेळेला मी व माझी मुलगी कोमल आम्ही दोघी उपस्थित राहिलो होतो. दोनशे पुस्तके होती. प्रकाशन उत्तमच झाले.पुस्तकं बॅगमध्ये भरली. पण बॅग कुठे उचलतीये ,? जिना उतरून खाली आम्हाला प्रशांत ठाकरे सरांनी पुस्तकांची बँग आणून दिली.

आपले हे जे कुटुंब आहे . मराठी शिलेदार हे एक कुटुंब खरंच घरातल्या कुटुंबापेक्षाही खूप जपणूक करणार आहे. मनाची , नात्याची जपणूक करतात शिलेदार. मदतीसाठी हात सरसावतात .मदत जिथे हवी तिथे मदत पटकन करणारा आपला हा समूह मला पहिल्यापासूनच भावलेला आहे .

मा.राहुल सर अगदी पहिल्यापासून मी माझ्या भाषणातही बोलले की नऊ वाजले की मला वाटायचं की आता कुठला विषय येतोय ,हा विषय पाहायचा आणि लेखन करायला सुरुवात करायची बऱ्याचदा रात्री एकेक दीड वाजता मी लेखन करायची आणि चक्क त्याला मला रिप्लाय यायचा राहूल सरांचा. मी त्यांना म्हणायची अहो! सर किती काम करता झोपा आता किती वाजलेत? असे हे अविरत कार्य करणारे आपले राहुल सर सर्वांच्या पाठीशी ठाम उभे आहेत. त्यांना समूहामध्ये शिस्तप्रियता लागते. जरा जरी कुठला पण एखादा चुकून मेसेज गेला तर डायरेक्ट रिमूव्ह करतात त्या ग्रुप मधून. हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. अशा या राहूल सरांबरोबर शिस्तप्रिय राहूल सरांबरोबर मी गेली सहा ते सात वर्ष काम करत आहे. या समूहातून मला खूप खूप शिकायला मिळालं ‘वाचाल तर वाचाल !’ या उक्तीप्रमाणे खरोखरच होते वैशालीताई ,सविताताई ,सुधाताई स्वातीताई ,सिंधुताई संग्राम सर, अशोक सर ,हंसराज सर किती जणांची नावे घेऊ अशा सर्वांच्या लेखण्या खूप बहरलेल्या आहेत .नजीर भाऊ हायकू रचनेमध्ये नंबर वन .

अशा ह्या प्रत्येकाचे लेखन वाचून वाचून ,वाचून मी तयार होत आहे अवघ्या अडीच वर्षांमध्येच माझा काव्यसंग्रह तयार करायचा ,ते ही सरांच्याच माध्यमातून सरांनी मला विचारलं मी हो म्हटले माझ्या ब्लॉग त्यांना पाठवून दिला, आणि सरांनी त्यातूनच कविता निवडल्या. मी काही केलं नाही मी फक्त कविता दिल्या शुभेच्छा घेतल्या, मनोगत लिहिलं, ते मला काहीच माहित नव्हतं सरांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व केलं. आणि ‘गुंजन मनीचे’ स्वप्न साकार झालं .मला वाटायचं माझ्या नोकरीच्या या वीस वर्षांमध्ये आपल्याला एकही ट्रॉफी नाही मिळालेली .प्रामाणिकपणे काम करणे इतकेच वसूला माहिती.

माझ्या लहान मुलांच्या पर्यंत मूल्य संस्कारातून त्यांची जडणघडण त्यांचा हस्ताक्षर सुधारणा ,त्यांचा अभ्यास पूर्णत्वाला नेणं अध्यापन उत्तम करणं हे मला खूप आवडतं. त्यांच्यातच रमण पण कुठेतरी इतरांच्या घरात ट्रॉफी पाहताना असं वाटायचं काम करतोय एखादी ट्राॅफी आपल्याला पण हवी.पण आज माझं हे स्वप्न जे होतं ना ते स्वप्न साकार झालेला आहे आणि आज माझ्याकडे जवळ ३५ ट्रॉफी आहेत .मी देवाला एक ट्रॉफी मागितली होती असावी म्हणून. पण देवाने माझ्या कार्याची पावती लोकांपर्यंत महाराष्ट्रात पोहोचवली. आणि राहूल सरांच्या मुळे मी आज उभी आहे या साहित्य क्षेत्रामध्ये.

मला कवयित्री म्हणून हा सन्मान मिळाला. लेखिका म्हणून सन्मान मिळाला. आदर्श शिक्षिका म्हणून सन्मान मिळाला. आणखी काय हवं समाजामध्ये उच्च स्थानावरती पोहोचण्याचा प्रयत्न कायम करत राहील .मी चांगल्या वागण्यातून, चांगल्या विचारातून ,चांगले संस्कार मुलांवर घडवून स्वतःही पुढे जायचं समाजाला पुढे न्यायचं आणि सर्वांच्या छान आशीर्वाद घेऊन कार्य करत राहायचं. या कार्याची पावती आपल्याला आपल्या समूहामध्ये खूप उत्तम रित्या मिळते. वर्षातले दोन दिवस २७ फेब्रुवारी मराठी दिन ,आणि बऱ्याचदा नोव्हेंबर मध्ये होणारा हा कार्यक्रम या कार्यक्रमाला एक वेगळं तेज असतं एक वेगळी भरारी आहे. या कार्यक्रमामुळे या कार्यक्रमामुळे आपली ओळख निर्माण होते. या कार्यक्रमामुळे माणूस माणसाला किती जीवलग आहे हे समजतं .

आपल्या नातलगांपेक्षाही आपले हे शिलेदार समूहातील प्रत्येक मनुष्य हा जीवलग झालेला आहे. एकमेकांबद्दल विचार अप्रतिम आहेत .एकमेकांना रिस्पेक्ट देण्याची पद्धत छान आहे. नेवासानंतर आता प्रथम आम्ही भेटल्यानंतर प्रत्येक जण तोंड भरून स्तुती करताना दिसत होता. आम्ही बायका पटकन गळाभेटी घेतो . आदबीने पुरुष बोलतात. हा मान सन्मान कुठे मिळणार आहे, नाही कुठे मिळत.आपल्या घरात एखादा व्यक्ती तसा कुटुंबाला धरून ठेवणारा असतो, त्याप्रमाणे इथे कुटुंबाला धरून ठेवणारे आहेत मा.राहूल सर, सवू ताई वैशालीताई ,संग्राम सर , सर्व शिलेदार . पद्माताई ,पद्माताईंना विसरू शकत नाही मी अबोल व्यक्तिमत्व पण त्या अबोल व्यक्तीमत्त्वातून डोळ्यातून नजरेतून , देहबोलीतून समजणारी ही जी भाषा ती खरच त्यांची फार फार हार्ट टचिंग असते. त्यांची भाषा अशा या व्यक्तिमत्त्वाला सुद्धा मी विसरू शकत नाही. आता नवीन नवीन लोक आलेली आहेत या सर्व नवीन शिलेदारांची लेखणी अतिशय उत्तम आहे .हल्ली जरा काही घरगुती कारणामुळे मी लिहू शकत नाही पण समूहावरती लक्ष असतं विषय कोणता आहे. हल्ली फक्त वेळ मिळाला की चटकन लिहते अगदीच नाही तर चारोळी तरी लिहिते,हायकू पण लिहिते तसा माझा प्रयत्न असतो कारण लेखन करणं हे डोक्याला, विचारांना चालना करून देणार आहे. आपल्या डोक्यातले इतर फालतू विचार दूर करणारे आहे. आणि हे सगळं आपल्याला समोर मिळतंय आनंदाचे क्षण या समूहात आल्यानंतर आपण उपभोगतो. यासाठी खरंच असे सरांनी कार्यक्रम ठेवतातच त्याचा उपभोग सर्वांनी घ्यावा. काल सुद्धा खूप लांब लांबून लोक आलेले होते. प्रवासाला पंधरा तास लागले ,वीस तास लागले ,अगदी एक दिवस गेला. मला सुद्धा पुण्याहून तिथे पर्यंत नऊ दहा तास लागलेच की पण आपण पोहोचलो.

राहुल सर दोन दोन बस पकडून लातुरला आले होते. त्यांना खूप त्रास झाला .पण राहूल सरांच्या चेहऱ्यावर त्रास दिसत नाही त्रास करून घेतात. एकच सांगेन सर तुम्हाला ‘ तब्येत सांभाळा ,समूह आपलाच आहे’. मनःपूर्वक धन्यवाद सर कालचा कार्यक्रम खूप खूप छान झाला.

अप्रतिम झालाच याचे सर्व श्रेय आपल्याला, सहप्रशासकांना लातूरकरांना जाते. खूप खूप धन्यवाद आणि अजून एक सांगावेसे वाटते की ‘गुंजन मनीचे’ या पुस्तकातील माझी ‘मूल्य संस्कार’ ही कविता या कवितेचे अवलोकन माजी प्राचार्य डॉक्टर माधव गाडेकर या ज्येष्ठ साहित्यिकांनी अप्रतिम केलं .काय शब्दांची फेक होती . अगदी हृदयात खोलवर रुजले गेले माझ्या ते शब्द अजूनही त्यांचा भाषण सतत स्मरत आहेत. ओके ठीक आहे मनोगत खूपच लांबले आहे माझे जे मनात आहे ते बोलल्याशिवाय राहत नाही नात्यातली काही लोकं आपल्याला गोत्यात आणतात ,पण ही जोडलेली नाती जी आहेत ही गोत्यात न आणता एकमेकांच्या मदतीला धावतात. हे प्रत्यक्ष पाहिले ,अनुभव घेतलाय, आणि त्यामुळे आपलं हे शिलेदारांच कुटुंब अधिकाधिक वृद्धिंगत होवो. अशीच आपल्या सर्वांकडून माया प्रेम लाभो हीच अपेक्षा ठेवते आणि वसुधा आता थांबते धन्यवाद धन्यवाद….

*वसुधा नाईक,पुणे*
*सदस्या मराठीचे शिलेदार समूह*

(सर्वांना भेटण्याची आतुरता होती.पण पतीच्या आजारपणामुळे थांबता आले नाही..सर्वांनी मला क्षमा करावी ही विनंती.)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles