‘संवेदना आणि वेदना यातूनच काव्यनिर्मिती होते’; शर्मिला घुमरे – देशमुख

‘संवेदना आणि वेदना यातूनच काव्यनिर्मिती होते’; शर्मिला घुमरे – देशमुखपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_राज्यस्तरीय कवी संमेलनाध्यक्षा शर्मिला देशमुख यांचे प्रतिपादन_

लातूर: मराठी भाषेसाठी खेदाची बाब म्हणजे आज मराठी भाषेला उतरती कळा लागली आहे आणि माय मराठीला सावरण्यासाठी, खंबीरपणे उभा राहिले आणि त्यांनी असे कितीतरी शिलेदार उभे केले. जे मातृभाषेच्या सेवेसाठी तत्पर आहेत. आजचा हा कार्यक्रम म्हणजे त्याचीच प्रचीती. आज आपणाकडे पाहून माय मराठीच्या आशा नक्कीच पल्लवीत झाल्या असतील. कवी म्हणजे कोण असतो ? असे विचारले तर मी म्हणेन जो शानदार, जानदार आणि ईमानदार असतो तो कवी असतो.
जो सहज सहज शब्दांना एका तारेत जुळवण्याची क्षमता ठेवतो तो कवी असतो.
कवी म्हणजे कोण असतो ?
कवी म्हणजे मृदू मनाचा
कोमल भावनांचा
जीवंत झरा असतो
कवी म्हणजे कोण असतो ?
स्पर्श करावा तिथे जल वहावे असा त्याचा भाव असतो असेल कितीही मृदू कोमल प्रसंगी भावनांचा लाव्हा असतो
कवी म्हणजे कोण असतो ?
उत्प्रेक्षा, उपमा अलंकाराच्यांही
पलीकडे जाऊन
भाषेला सजवणारा
तोच एक अलंकार असतो
कवी म्हणजे कोण असतो ?
नेत्र बंद असताना
मन: चक्षुने भिंतीपलीकडे जग पाहणारा मनातील भाव चेहऱ्यावर ओळखणारा एक मनकवडा असतो. असे काव्यात लीन होण्याची क्षमता एका कवीत असते, कवी जाणिवेपेक्षा नेणिवेत अधिक जगतो ….. “मीच आहे जरासा एकटा – एकटा राहणारा, वाळकं पान सुद्धा गळतांना, तन्मयतेने पाहणारा ” असते. ही संवेदनशक्ती फक्त कवीतच असू शकते. आणि संवेदना आणि वेदना यातूनच तर काव्यनिर्मिती होते. असे प्रतिपादन शर्मिला देशमुख यांनी केले. त्या लातूर येथील राज्यस्तरीय कवी संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या.

मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या वतीने दि 3 नव्हेंबर रोजी पुरस्कार वितरण व कवी संमेलन आयोजन लातूर शहरात केले होते या संमेलनास महाराष्ट्रातून अनेक कवी – कवयत्री हजर होते या संमेलनात 91 कवी कवयत्रींना साहित्यगंध पुरस्कार प्रदान करण्यात आले , 35 शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार , 10 संपादकांना उतकृष्ट पत्रकारिता पुरस्कार , 5 जणांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले यात शर्मिला देशमुख -घुमरे याना राज्यस्तरीय साहित्य गंध पुरस्कार देण्यात आला.

त्या आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना पुढे म्हणाल्यात की, कवितेचे महत्त्वाचे घटक म्हणजे भाव आणि भाषा, भाव हा कवितेचा आत्मा असतो, मग या भावांमध्ये मानवी मनाची उकल करणारे प्रेम, माया, मोह, व्देष, राग, मातृत्व, देशप्रेम, विद्रोह, वेदना, आनंद, जिव्हाळा, आपुलकी, विरह, क्रोध अशा विविध भावनांचा समावेश असतो. आता या भावनारूपी आत्म्याला आवश्यकता असते देहाची. हा देह म्हणजेच भाषा, आत्मा आणि देह यांच्या एकत्रीकरणातून जसा जीव निर्माण होतो, तसा भाव आणि भाषा यांच्या मिलनातून काव्य निर्मिती होत असते.

आपण जेव्हा काव्यनिर्मितीसाठी भाषेचा वापर करतो तेव्हा शब्दांची काळजी घेणे आवश्यक असते. शब्दांचे विविध अर्थ असतात. त्यात वाच्यार्य, लक्षार्थ आणि व्यंगार्थ हे प्रमुख तीन अर्थ आहेत. देश, काल, स्थल, यानुसार अर्थ बदलत असतात याही पत्नीकडे जाऊन कवीने स्वअर्थातून काव्यनिर्मिती केलेली असते. वाचक रसिक असतात ते स्वतःच्या भावविश्वासी जुळणारे विविध अर्थ निर्माण करत असतात अशावेळी कवीची जिम्मेदारी वाढते की काव्यातून कोणाच्या भावना दुखावू नयेत. शब्दांचे गैर अर्थ निघू नयेत कारण –
“शब्दांत निखारा फुलतो
शब्दांत फुलही हळवे
शब्दांना खेळवितांना
शब्दांचे भान हवे”

काव्या कवीच्या स्वअनुभवातून स्फुरत असते. कवी आपले आत्मभान जागृत ठेवून अंतर्मुख होऊन काव्याची निर्मिती करत असतो आत्मभान आणि अंतर्मुखता जागृत असणे म्हणजे काव्य जीवंत असणे होय. काव्य अंर्तआत्म्यातून निघणे आवश्यक असते. भावना नसतील तर ते फक्त शब्दांचे भांडार बनते.असेही त्या म्हणाल्यात.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिवमती सविता पाटील ठाकरे या होत्या तर प्रमुख उपस्थिती माजी खा डॉ सुनील गायकवाड माजी प्राचार्य डॉ माधव गादेकर , राहुल पाटील नागपूर , यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला मराठीचे शिलेदार संस्था राज्यस्तरीय मराठी भाषेचे संवर्धन करणारी संस्था असून या संस्थेमुळे नवनवीन कवींना प्रेरणा देण्याचे काम ही संस्था करते तसेच कवींना व्यासपीठ निर्माण करून देते.संस्थेच्या माध्यमातून मराठी भाषेचे संवर्धन केले जाते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles