
गोंडपीपरीत 20 नोव्हेंबर रोजी विदर्भस्तरीय मराठी कविसंमेलनाचा गजर
_काव्यरसिकांना मिळणार कवितांची मेजवानी_
चंद्रपूर: जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात प्रथमच धनोजे कुणबी सभागृह येथे विदर्भस्तरीय मराठी कविसंमेलनाचे आयोजन २० नोव्हेंबर २०२२ ला करण्यात आले असून त्यात अनेक दिग्गज कविंच्या कवितांचा पाऊस पडणार असल्याचे आयोजक दुशांत निमकर आणि गणेश कुंभारे यांनी सांगितले आहे.
जीवन गौरव मासिक प्रणित जीवन गौरव साहित्य परिवार महाराष्ट्र राज्य आणि शब्दांकूर फाऊंडेशन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणा-या एकदिवशीय कविसंमेलनाचे अध्यक्ष धनंजय साळवे, गटविकास अधिकारी गडचिरोली, उदघाटक विदर्भ माध्य.शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, तर प्रमुख अतिथी श्रीकृष्ण अर्जूनकर गडचिरोली,चेतनसिंह गौर,चेतन ठाकरे,रेखाताई कारेकर,राजेश ठाकूर चामोर्शी यांच्या उपस्थितीत अहमदनगरचे गझलकार रज्जाक शेख,ग्रामकवी आनंदा साळवे, यवतमाळहून लोककवी विजय ढाले या मान्यवरांची देखील उपस्थिती राहणार आहे.संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून जनता कनिष्ठ महाविद्यालय, गोंडपिपरी येथील प्रा. संतोष बांदूरकर हे राहणार असून सदर कार्यक्रम तीन सत्रात पार पडणार आहे.
नियोजनानुसार पहिल्या सत्रात उदघाटन आणि निमंत्रित कवींचे कविसंमेलन,दुस-या सत्रात नोंदणी झालेल्या कवींचे कविसंमेलन आणि तिस-या सत्रात समारोप होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना जिडकुंठावार,नरेशकुमार बोरीकर चंद्रपूर व वंदना डगवार हे करणार आहेत.संमेलनादरम्यान साहित्य लेखन गौरव पुरस्काराचे निकाल घोषित केले जाणार असून मान्यवरांचे हस्ते पुरस्कार प्रदान केले जाईल.
विदर्भातील सर्वच जिल्ह्यातून कवी सहभागी होत असून त्यांच्या उत्कृष्ठ कवितांची मेजवानी गोंडपीपरी नगरातील काव्य रसिकांना मिळणार आहे.कविता सादरकर्त्यास स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.उपस्थित सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था सुद्धा केली जाणार आहे.संमेलनाच्या यशस्वीतेसाठी जीवन गौरव साहित्य परिवार आणि शब्दांकूर फाऊंडेशनचे सभासद प्रयत्न करीत आहेत.