‘अनुभवले मी ते क्षण आनंदाचे’; पुष्पा डोनीवार

‘अनुभवले मी ते क्षण आनंदाचे’; पुष्पा डोनीवार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

✍️भव्यदिव्य सदाबहार साहित्यगंध दीपोत्सव सोहळा एक आगळा वेगळा सप्तरंगानी,सुरमणी ताला सुरांत पुष्प फुलांनी सजलेला, नटलेला चहुदिशी बहरून मराठमोळ्या फेटा पगडी मराठी वेषभूषात हा मराठी शिलेदार परिवार मोठ्या थाटामाटात सजला.आन बान शान आमुची मायबोली मराठी भाषा किती गोड मुखातून शब्द निघती सुंदर अविट…मराठी शिलेदार संपूर्ण देश राज्य विश्वात गुंजतो सुगंधित पुष्प फुलांनी बहरलेला आमचा मराठीचे शिलेदार समूह परिवार वंदन माय मराठीला सदोदित करते मानाचा मुजरा🙏

मूर्ती लहान कीर्ती महान
असे ते सुंदर व्यक्तिमत्त्व
नांव तयांचे श्री राहुल पाटील
कल्पवृक्ष शिलेदारांचे ते देवत्व

📙साहित्यगंध दीपोत्सव अंकाचे मुखपृष्ठ अतिशय सुंदर, भारतीय स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सवाला अनुसरुन मुखपृष्ठावर सुंदर चित्राकंन रेखाटन आणि एक कोमल सुंदरशी छोटीशी गोड परी राहुलदादांची छकुली हर्षिता एका हाती तिरंगा झेंडा आणि दुसऱ्या
हाती प्रकाश दीप घेऊन ती मुखपृष्ठावर किती शोभून दिसते. मन ह्रदयास भावले.
📖 साहित्यगंधचे एक एक पान विविध लेख,मुलाखतींनी बहरलेले. ज्ञानबोध घेण्या इतपत
अंकात ज्ञानाचा खजिना भरलेला आहे. वाचकांनी तो मन मंदिरी ह्रदयात तो श्रवण करावा.भावनात्मक कवितेचा सुंदर साठा अंकात भरलेला आहे. कथाकथन अप्रतिम मांडणी विचारसरणी. माननीय श्री राहुल पाटील सर, सौ पल्लवीताई पाटील,अमृताताई, तारकाताई, प्रशांत ठाकरे सर यांच्या मुलाखती अतिशय वाचनीय आहेत.सर्व शिलेदार साहित्यिकांचे कौटुंबिक फोटो अंकात छापलेले बघून खूप छान वाटले मनास.

🚩मराठीचे शिलेदारांचा राज्यस्तरीय कविसंमेलन साहित्यगंध दीपोत्सव सोहळा दि.३/११/२०२२ ला मराठवाडा लातूर या सुंदर नगरीत संपन्न झाला.खूप सुंदर पद्धतीने सोहळा बघतच रहावं असं वाटत होतं.

हाती विणा घेऊन शारदा
गाईले सुरवेणुचे मधुर वाणीतुन
संबळ वाजला लातुरात…..
शिलेदारांचे मन गेले आनंदून

लातूर नगरीतले आयोजक संचालन कर्ते मुख्य सह प्रकाशक आदरणीय श्री संग्राम कुमठेकर
दादा यांनी खूप सुंदर पद्धतीने कार्यक्रमाचा भार सांभाळला आणि संचालन खूप छान केलेत. संमेलनाच्या अध्यक्षा मुख्य प्रशासक आदरणीय सौ. सविताताई ठाकरे आपल्या मधुर वाणीने आपल्या भाषणातून सर्वांना मंत्रमुग्ध केलेत.कवीसंमेलन अध्यक्षा आदरणीय सौ. शर्मिलाताईनी आपल्या मधुर वाणीतून सुंदर विचार आणि मार्गदर्शन प्रेरणादायी केले. एक गोष्ट मनात ह्रदयात रुजली ती म्हणजे त्यांनी म्हटले जेव्हा मी मंचावर बसले तेव्हा सर्वात आधी लक्ष मंच्यावर सजवलेल्या सुंदर फुलांकडे गेले फुलांनी आपण सजावट करतो नंतर त्यालाच फेकूनही देतो खोटं नाही सांगत मला त्यावेळी रडायला आलं.

माझे नाव ‘पुष्पा’ आहे ना? आपलेपण आयुष्य जीवन असेच फुलांप्रमाणे सर्वांचेच तसेच.जो पर्यंत शरीरात आपल्या श्वास आहे श्वास निघून गेला की काय असत काही नाही.🌹फूल ताजे असते तोवर टवटवीत आणि सुंदर दिसतात मनाला सुगंधित वास देतो मुरझले कि सुगंध नाहीसा होतो, म्हणूनच तर, 😀जीवन आहे तोवर हसत खेळत जगावे..दुःख न मनात ठेवता फेकून ते आनंदाने राहावे.
🙏मंचावरील प्रत्येक मान्यवरांचे भाषण मार्गदर्शन अनमोल विचार आमच्या प्रिय वैशालीताईचे बोलण्यांचे अतिउत्तम धाडस केले. आदरणीय किशोर भोयर दादा बद्दलचे मत. त्यांच्यामुळेच त्या कुठवर पोहचल्या ताईचे विचार ऐकून मन गहिवरले. तारकाताईचे सादरीकरण खूप सुंदर होते सुधाताईचे सादरीकरण खूप सुंदर होते.सर्वच कवी-कवयित्रीचे कविता सादरीकरण खूप छान होते.

🙏खरी परिस्थिती सांगते लातूरला जायच्या वेळी अडचणी आल्यात. वैशालीताईचा फोन आला लातूरला येणार का म्हणाल्या मी विचारात पडले विचार करुन सांग म्हणाल्या. कारण मला टायफॉइड झालेला होता खूप अशक्तपणा शरीरात जाणवत होता. जायची तर मला हौस होती. कवी संमेलन म्हटले की मला आनंद होतोच. परंतु माझे पती जा म्हणाले मला काहीच
झालेले नाही माझी तब्येत चांगली आहे असे समजून जा वैशालीताई तर तुझ्यासोबत आहेत मग मी देवाला रोज प्रार्थना करायची मला बळ आणि शक्ती द्या लवकर बर करा खर सांगू माझे पती माझ्यासाठी देवच आहे त्यांची साथ मला आहे माझ्या पाठीशी सदैव असतात मी तयारी केली वैशालीताईच्या कुंटुबासोबत फुल्ल मस्ती करत लातूरला पोहचली. रूमवर जीवाभावाचे प्रिय सखी सुधाताई, तारकाताई, रंजनाताई, सविताताई धमगाये, सविताताई ठाकरे त्यांचा परीवार, किशोर भोयर दादांचा परीवार सर्वांना
भेटून खूप खुशी झाली. मग चेहर्‍यावर आनंदाची लाट पसरली आणि चेहर्‍यावर हसू फुलले. आमच्या राहुल सरांचे दर्शन प्रत्यक्षात झाले. माझी तब्येत एकदम ठणठणीत बरी झाली आणि कविसंमेलन सोहळ्यात
दूरदुरुन आलेले सर्व मराठी शिलेदार परिवार भेटला एकमेकांच्या गाठीभेटी संवाद कौतुक केले जेव्हा आपले कुणी कौतुक करतात तेव्हा गगनात उडाल्यासारखे वाटते. सोहळ्यात जेव्हा सामील होतो
असे वाटते कश्मीर नंदनवनातच आलो आहोत असे जाणवते.

☺️मला समजुन घ्यावे सर्वांनी..मी माझ्या कुटुंबात आनंदी आणि समाधानी आहे फक्त तब्येत कधी कधी बरी नसते म्हणून समूहात रचना करु शकत नाहीत गैरसमज नकोत. मराठीचे शिलेदार परिवारात जुळले स्नेहबंध नाते जुळले जीवाभावाचे खूप मोठा परिवार मिळाला राहुल सरांच्या मराठीचे शिलेदारात भरपूर मान सन्मान मिळाला प्रसिद्धी मिळाली अजून काय हवं मला. मला फार मोलाच धन मिळालं हे मी माझे भाग्यच समजते.असो राहुल सर जर माझ्याकडून लिहिण्यात चूक झाली असेल तर माफ कराल हि विनंती शतशः

माय मराठी मायबोलीला मानाचा मुजरा करते.

✍️सौ पुष्पा डोनीवार
चंद्रपूर
माजी कवी संमेलनाध्यक्षा
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles