आर्वीत राष्ट्रवादी महिला आघाडी कडून निषेध
_अनोख्या पद्धतीने नोंदवला निषेध खोक्यावर लावले मंत्र्याचे फोटो_
वर्धा: महाराष्ट्र राज्यात जेंव्हा पासून शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आलं तेंव्हा पासून सातत्याने या सरकारचे जबाबदार मंत्री सर्रास मनात येईल तसे वाह्यात, शिवराळ अश्लील, शब्दाचा महिलां विषयी प्रयोग करत आहे, आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करून आपण त्यांना मूक संमती दिली याची सुद्धा आता नागरिकांमध्ये सुप्त चर्चा सुरु झाली आहे, असे राष्ट्रवादी ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
त्याचसोबत महिलांवर होत असलेल्या या टिकेवरून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची सुद्धा प्रतिमा मालिन होत आहे,असे सुद्धा निवेदनात नमूद असून सुप्रिया सुळे यांच्यावर राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानाचा जाहीर सुद्धा निवेदनात उल्लेख केला केला आहे.यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादी चे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.