
“आम्ही साहित्यवारीचे प्रवासी”; सुधा मेश्राम
🚩माय मराठीच्या संवर्धनासाठी राहुल भाऊंची चाललेली धडपड, नव कवीनां व्यासपीठ मिळवून देण्यासाठी साप्ताहिक साहित्यगंध उपक्रम सुरू गेला. २०१८ पासून दिवाळी विशेषांकाची सुरुवात केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी विशेषांक म्हणजेच साहित्यगंधाचा दिपोत्सव सोहळ्याचे प्रकाशन, राज्यस्तरीय कविसंमेलन लातूरला ठरले. त्यादिवशी पासून रात्रीचा दिवस करून कार्य सफल होण्यास त्यांची तळमळ दिसून येते. त्यासाठी काटेकोरपणे , शिस्तबद्ध त्यांचे महानकार्य हे वाखाणण्याजोगी आहे.वरून जसा नारळ टणक दिसतो; पण आतून हा नरम असते. तसेच राहुल भाऊंचे मन आहे. सर्वांची त्यांना काळजी असते यांची प्रचिती जेव्हा बन्सोड दादा आणि संदीप दादाची ट्रेन सुटली त्यावेळी त्यांची कुठे व कशी सोय होईल यासाठी तगमग बघायला मिळाली.
🦚 दिवाळीसणाच्या निमित्ताने सुट्या असल्याने प्रवासांची सर्वत्र गर्दीच गर्दी दिसत होती. दिवस भराच्या प्रवासात चेह-यावर असलेला क्षीण हा पळून लावण्यासाठी आम्ही सर्वजनी एकमेकांशी हसत खेळत संवाद साधत होतो. तारकाताईचा खळखळून हसणारा आवाज, रंजनाताईचा आणि प्रतिभाताईचा मृदू, कोमल आवाज मनाला मोहून टाकणारा होता. एकमेकांशी जेवणाचा डब्बा शेअर करत भोजनाचा आस्वाद घेतला. खोब्रागडे दादा व त्यांची सहचारिणी प्रतिभाताईची भेट तसेच अधूनमधून चंदूदादा फेरफटका मारून आम्हा बहिणीची काळजी घेत होते.
💫एकमेकांशी गप्पा गोष्टी करत असतांनाच सुमधूर गाण्याचा आवाज कानी पडत होता. दोन्ही आवाज हे कुणाचे असेल यांची उत्सुकता वाढत चालली होती. शेवटी ते जवळ येताच धक्का बसला होता. कारण दोन्ही माणसे ही एकमेकांचे आधार म्हणजेच जीवनसाथी होते. डोळ्यांने अंध असल्याने पत्नीच्या खांद्यावर हात ठेवून गाणे म्हणत म्हणत मिळेल त्यातच समाधान मानून पुढे चालत होते. या वयोवृद्धातही आपल्या पोटाच्या भाकरीची सोय करण्यासाठी गाणे म्हणून प्रवासांची मने जिंकत होती. मी ही थोडी भावूक झाली आणि त्यांना थांबवून एक गीत म्हणायला लावले ते मी कॅमेरात कैद करून ठेवले. त्या गीताचे बोल ओळखा बघू… नाही ओळखलात ना…थांबा हं ! …मी सांगते बरं का ? पण माझा आवाज हा बेसूर आहे. म्हणून मी लिहूनच पाठवते आणि ते लिहता लिहता माझ्याबरोबर गुणगुणायला सुरुवात करा अशी आशा बाळगते.
‘एक प्यार का नगमा हैं , मौजो की रवानी हैं
जिंदगी और कुछ भी नहीं,तेरी मेरी कहानी हैं…’
कुछ पाकर खोना हैं ,कुछ खोकर पाना हैं
जीवन का मतलब तो,आना और जाना हैं
दो पल के जीवन से,इक उम्र चुरानी हैं…
जिंदगी और कुछ भी नहीं,तेरीमेरी कहानी हैं..
तू धार है नदिया कि,मै तेरा किनारा हू
तू मेरा सहारा है,मै तेरा सहारा हू
ऑखो मे संमदर हैं,आशाओ का पानी हैं…
जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी हैं…
तुफान को आना है,आ कर चले जाना है
बादल है ये कुछ पल का,छा कर ढल जाना है
परछाईयॉ रह जाती,रह जाती निशानी है…
जिंदगी कुछ भी नही ,तेरी मेरी कहानी हैं….
जो बीत गया हैं वो,अब दौर न आएगा
इस दिल मे सिवा तेरे,कोई और न आएगा
हार फूॅक दिया हमने,अब राख उठानी हैं…
जिंदगी और कुछ भी नहीं,तेरी मेरी कहानी हैं..
एक प्यार का नगमा है..
एकमेकांचे सांगाती
घेऊन हातात हात
सुख आणि दुःखात
निघाली गाणे गात…
(क्रमशः)
✍🏻सुधा अश्वस्थामा मेश्राम
अर्जुनी/मोर.गोंदिया
मुख्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समुह