Home गावगप्पा ‘साहित्यगंध पुरस्काराने दिला निखळ आनंद’; अमृता खाकुर्डीकर

‘साहित्यगंध पुरस्काराने दिला निखळ आनंद’; अमृता खाकुर्डीकर

276

‘साहित्यगंध पुरस्काराने दिला निखळ आनंद’; अमृता खाकुर्डीकरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुणे: येथील कवयित्री, लेखिका आणि ‘बिनधास्त’ न्यूज पोर्टलच्या पुणे पत्रकार प्रतिनिधी सौ.अमृता अरूण खाकुर्डीकर यांना ‘मराठीचे शिलेदार’ या संस्थेचा ‘साहित्यगंध’ पुरस्कार प्रदान करण्यात आला असून त्यांनी,” अतिशय सुरेख शब्दातील मानपत्र, रेखीव सन्मानचिन्ह आणि जपून ठेवावे असे मेडल” अशा शब्दात पुरस्काराच्या स्वरूपाचे कौतुक केले आहे. पुरस्कार स्वीकारल्यावर ‘साहित्यगंध पुरस्काराने निखळ आनंद दिल्याची’ भावना त्यांनी आवर्जुन व्यक्त केली.

नागपूर येथील “मराठीचे शिलेदार”ही बहुउद्देशीय संस्था मराठी साहित्य आणि मराठी भाषा संवर्धनासाठी उत्तम काम करीत असून विविध पुरस्काराने शिक्षक, पत्रकार, नवोदित कवी, लेखक अशा गुणवंतांचा सन्मान करून त्यांच्या पाठीवर प्रोत्साहनाची थाप आणि मनाला निखळ आनंद देत असल्याबद्दल त्यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला व सर्व पुरस्कारार्थींचे मनापासून अभिनंदन केले आहे.

अमृता खाकुर्डीकर यांना “साहित्यगंध” पुरस्कार देताना त्यांचे ” व्यक्ती .. अभिव्यक्ती” ” जुन्या वाटा..नव्या दिशा” हे लेखसंग्रह, ” तरी..अंतरी” “कळ्या पाकळ्या” हे कविता संग्रह, ” चल जाऊ बाजारी” हा चारोळीसंग्रह, “नादे हृदयांतरी” हा म्युझिक अल्बम तसेच विविध नियतकालिके, वर्तमान पत्र, ब्लाॅग, फेसबुक या सर्व माध्यमातून प्रसिध्द होणारे वैचारिक, ललित, समीक्षात्मक लेखन लक्षात घेऊन त्यांच्या या खास साहित्यिक योगदानास्तव सौ. अमृता यांची पुरस्कारासाठी संस्थेने निवड केली आहे.या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यापूर्वी अमृता खाकुर्डीकर यांना पत्रकारिता आणि काव्य क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त आहेत.