“आम्ही साहित्यवारीचे प्रवासी”; सुधा मेश्राम

“आम्ही साहित्यवारीचे प्रवासी”; सुधा मेश्राम



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

🔹 मराठीचे शिलेदार प्रकाशनतर्फे तसेच आपल्या सर्वांच्या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावरील मांडणी आणि सजावट करणारे आ. गौरव ढोक हे सुद्धा आमच्याच गाडीत अकोल्यावरून बसणार होते. अकोल्यावर गाडी पोहचतात फोन करून विचारणा केली असतात मला यायला १५ ते २० मिनिट लागतील असे बोलले आणि त्यांची पण ट्रेन सुटली. इकडे बन्सोड दादा,संदीप दादा तसेच आता त्यांच्यात गौरवदादा सामील झाले होते ,आजचा दिवसच हा बरोबर नव्हता.आमची तिकीट ही आरेसीमधे होती त्यामुळे एक व्यक्ती आमच्या सोबत होते. आमचे संवाद ऐकत असतांना त्यांना कळले कि आम्ही कविसंमेलना चालले आहेत म्हणून थोडी विचारपुस्त करत होते ,ते अमरावतीचे राहणारे होते. हेमंत पाटील दादांना आमच्या गोंदिया जिल्ह्याची सर्वच माहिती होती कारण ते काही वर्षं देवरीला जाब करत होते. स्वभाव त्यांचा खुप मायाळू आणि वाणीत गोडवा होता. ते प्राध्यापक असून अधिकार पदाचा गर्व त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत नव्हता.

मन मोकळेपणाने ते तारकाताई आणि माझ्याशी बोलत होते. त्यांच्याशी बोलता बोलता कळले कि त्यांची संत्र्याची बाग आहे त्यांनी आपल्या पिशवीतून संत्र काढून आम्हाला खायला दिलं. परक्या व्यक्तीने एखाद्या खायला दिले तर आम्ही नकार देतो परंतु त्यांच्या बोलण्यावरून परकं वाटतच नव्हते. आपल्या जवळचे आहेत असे वाटत होते. आपुलकीने चौकसी करत होते. तुम्ही कवी आहात तर एखादा काव्यसंग्रह काढला काय असे विचारले असता माझी पुस्तक त्यांना भेट म्हणून दिली असता वाचण्यास सुरुवात केली.पुस्तकांची वरवर चाळणी केल्यानंतर तुमच्या कविता ह्या खुप सुंदर आहे त्यांतील ‘वृद्ध बापाचा देह’ हि कविता हदयस्पर्शी करून गेली तसेच त्यांना कळलं कि किती बरं वाईट प्रसंग तुमच्या जीवनात घडलं…. आणि अशा प्रसंगातही तुम्ही धैर्याने उभे आहात आणि असेच मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा व मुलांना चांगले घडवा हिच आपली संपत्ती आहे असे बोलले. कोण कुठलं पण धीराचे दोन शब्द दिलं तर मनाला बरं वाटलं. अशाप्रकारे प्रवासात वेगवेगळे अनुभव पहायला मिळाले होते.

🍁एकदाची आमची ट्रेन जवळपास लातूरला ५:३० ते पोहचली.भुरकेदादा,सविताताई लातूरच्या स्टेशनवर भेटले. सर्वच जन एका ठिकाणी जमा झाले.संग्राम दादांचा फोन कि तुम्ही मेन बसस्थानकावर या मी तेथे भेटते. आम्ही पोहचण्याच्याच अगोदर संग्राम दादाचं आगमन….किती बरं हा जिव्हाळ्या… मनावर कसल्याहीप्रकारे तान न घेता कविसंमेलनाला आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे आदरातिथ्य करत होते. सर्व मिळूनी दादांनी राहण्याची जिथे सोय केली होती तेथे नेले. कार्यक्रमाची सर्वच जबाबदारी खांद्यावर असतांनासुद्धा वेळातवेळ काढून आम्हाला थोडा वेळ दिला. त्यांनी केलेल्या निस्वार्थी भावनेला व कार्याला माझा त्रिवार वंदन… 🙏

घालून साज निघाली आज
तुळजापूर मी ग बाई
पाहण्या भवानीमातेचा ताज
सख्यानो करा तुम्ही घाई…

अशाप्रकारे नागपूर ते लातूर प्रवास झाला… एका रूममधे तारकाताई ,सविताताई, रंजना ताई आणि मी राहत होते .. सर्वच फ्रेश झाल्यानंतर आम्ही आणि भुरकेदादा सकाळचा नाश्ता करून तुळजापूरच्या प्रवासाला निघालो. भुरकेदादासोबत असणारा सहवास हा पहिल्यांदाच अनुभवला त्यांच्या स्वभाव तर सोज्वळ,निर्मळ होता मनाने तर ते दिलदार म्हणजे एकंदरीत त्यांचे दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते. आम्हा सर्वाची काळजी घेत होते. तुळजापूर पोहले तर बघते काय ? कुलस्वामिनी भवानी मातेच्या दर्शनासाठी रांगाची गर्दीच गर्दी होती. गर्दीतून वाट काढत काढत शेवटी भवानीमातेला नतमस्तक झाले

(क्रमश)

✍🏻 सुधा अश्वस्थामा मेश्राम
अर्जुनी/मोर.गोंदिया
मुख्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समुह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles