
‘कस्तुरीगंधीत क्षणांचा सोहळा’; ऊर्मी घरत
“मन विसावले आहे अजूनही तेथेच
सहवास लाभला विविध सृजनांचा,
माहेरची आपुलकी अन् माया लाभता
जिंकला मनात साज कस्तुरीगंधीत क्षणांचा”
मराठीचे शिलेदार समूह माझ्या लेखणीचे माहेर २०१७ पासून आजपर्यंत शब्द शब्द जोडून माझी लेखणी सुधारली येथेच. समूहाचे मुख्य, सर्वेसर्वा सन्माननीय राहुल पाटील सर , सर्व सहप्रशासक यांच्याबरोबर हा शब्दप्रवास अविरत चालू आहे. नागपूर नंतर लातूरचे हे साहित्यगंध दीपोत्सव एक आगळ वेगळं नातं जपणारं, अनेक ज्ञानी, वक्ते, गुरूवर्य यांची भेट वेगळच समाधान देऊन जाणारे होते. समूहावर मागच्या महिन्यापासूनची चर्चा पाहिल्यानंतर यजमानांना सहज म्हटलं मला लातूरला जायचे आहे. मनापासून इच्छा असली की सगळं जुळून येतं, याची प्रचिती त्याच दिवशी संध्याकाळी मला आली. कारण यजमानांनी चक्क लातूरचं बुकिंग करून मला आणून दिल.
खरंतर आपल्या समूहामध्ये परीक्षक, संकलक, सहप्रशासक अशा अनेक संधी उपलब्ध झाल्या. गेल्या काही दिवसात सगळीकडेच वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे ,समुहात कृतिशील नव्हते ,लिखाण थोडं कमी झालं होतं खरं, पण तरीही मराठीचे शिलेदार समूह आणि माझ्या लेखनाची सुरुवात त्याचे विस्मरण होणे नाही. लातूरच्या भव्य दिव्य सोहळ्याचं आणि हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी संग्राम दादा व सर्व आयोजक, समूहाचे मुख्य प्रशासक, सर्व सहप्रशासक , संपादक यांच्यातील एकमेकांच्या सहकार्याची सुरेख वीण अनुभवली. जीवन गौरव ,आदर्श शिक्षक ,गुरुवर्य यांचा सन्मान, समूहामध्ये कार्यरत तसेच लेखन करणाऱ्या माझ्यासह सगळ्यांचाच सन्मान करणारे आगळे वेगळे संमेलन अनुभवता आले , यासाठी मुख्य प्रशासक, सह प्रशासक, आयोजक या सर्वांचे मनःपूर्वक आभार*!!!
लातूरचा हा तेजोमय प्रवास म्हणजे एक मनस्पर्शी साहित्य मैफिलीची सफर. राहुलसर, संग्राम दादांसह मायाळू आपुलकीने स्नेह जपणाऱ्या वैशुताई, सवुदीदी, सुधाताई यांची प्रत्यक्ष भेट सुखावहचं. हा साहित्य प्रवास ,कस्तुरी गंधित क्षणांचा सोहळा असाच चालू राहू देत. हीच मधुरंगीत शुभेच्छा..,!!!
सौ.उर्मी (हेमश्री) घरत, पालघर
सहप्रशासक, संकलक, परीक्षक मराठीचे शिलेदार समुह