🚩आम्ही साहित्यवारीचे प्रवासी; सुधा मेश्राम

🚩आम्ही साहित्यवारीचे प्रवासी; सुधा मेश्रामपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

“सूर्यकिरणांनी दाहीदिशा उजळताच
सारस्वतांनी लातूरची धरली वाट,
रक्तपेढी रेडक्रास भवनात
होता मराठीचे शिलेदारांचा वेगळाच थाट”

🚩ज्या दिवसांची आम्ही आतुरतेने वाट पहात होतो. तो दिवस उजाडला आणि सारी ही लगबग सुरू झाली. भवनात पहिले पाऊल ठेवताच पाहतो काय? शिलेदारांचा तो आगळावेगळा थाट पाहून मन प्रसन्न झाले. कोण कुठले आपण पण समुहाच्या माध्यमातून प्रत्यक्षात भेट आणि एवढा मोठा गोतावळा बघून डोळेही पाणावले. खरं सांगायचे म्हणजे मी तहानभूकच विसरून गेली. या कार्याच्या यशस्वीसाठी झटणारे राहुल भाऊ, प्रशातं दादा, संग्राम दादा, क्षीसागरदादा, वैशालीताई, सविताताई, तारकाताई, हंसराज दादा, उरकुडेदादा यांच्याबद्दल काय बोलावे हेच कळत नाही निःशब्द मी…!! मुलीची तब्येत बरी नसतांनाही वेळात वेळ काढून समुहासाठी तळमळ दिसून येत होती. या सर्वांच्या कार्याला माझे शतदा नमन….!

माझ्या मायमराठीची बोली
आहे अमृताहूनी गोड
पाहूनी तिचा साज श्रृंगार
मनास लावते ही ओढ…

🚩 चला आपण कार्यक्रमाकडे वळू या…३ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यस्तरीय कविसंमेलन , दिपोत्सव सोहळ्याच्या प्रमुख अध्यक्षा आपणा सर्वांच्या लाडक्या शिवमती सविता पाटील, प्रदेशाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड सिल्वासा, या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.डॉ. सुनील गायकवाड,माजी खासदार लातूर, मराठीचे शिलेदार बहुद्देशीय संस्था नागपूरचे अध्यक्ष मा. राहुल पाटील. कविसंमेलनाध्यक्षा मा. शर्मिला देशमुख ,बीड,मा.बालाजी सगट गटशिक्षणाधिकारी गंगाखेड, प्रमुख अतिथी – मा. नरेश शेळके,अध्यक्ष शिवराज शिक्षण संस्था अंत्रीतेली, बुलढाणा तसेच मार्गदर्शक मा. सुधाकर भुरके, मा. डॉ.माधव गादेकर यांच्या उपस्थितीत मराठीचे शिलेदार बहुद्देशीय संस्था नागपूरतर्फे ‘ साहित्यगंध दिपोत्सव ‘ अंकाचे तसेच वसुधा नाईक,पुणे ‘गुजंन मनीचे’ काव्यसंग्रह ,गणेश कुंभरे, ब्रम्हपुरी ‘विचारक्षण’ यांच्या सुविचार संग्रहाचे प्रकाशन थाटामाटात पार पडले.

🦚शिक्षण क्षेत्रातील भावी पिढी घडविण्यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्ञाननिष्ठ, कर्तव्यनिष्ठ असा ३३ शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ तसेच शिक्षण क्षेत्रातील तनमनधनाने निस्वार्थ सेवाभाव करणारे अशा ५ जणांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ साहित्याच्या दिपोत्सवासाठी कार्य करणारे संपादक, सहसंपादक,पत्रकार १० जणांना ‘उत्कृष्ट संपादन/पत्रकारिता पुरस्कार’ तसेच दैनंदिन जीवनात अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणा-या २ जणांना ‘ युवा उद्योजक पुरस्कार ‘ साहित्यश्रेत्रातील लेख, कवी,कवियत्री, कथाकार, समीक्षक, परीक्षक असे ९१ जणांना साहित्यगंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अगदी हा उत्साहपूर्ण वातावरणात दिपोत्सव सोहळा पार पडला.

(क्रमशः )

✍🏻सुधा अश्वस्थामा मेश्राम
अर्जुनी/मोर.गोंदिया
मुख्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समुह
➿➿➿➿🌸🙏🌸➿➿➿➿

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles