पुण्यात मतदार नोंदणी मोहीमेस उत्तम प्रतिसाद

पुण्यात मतदार नोंदणी मोहीमेस उत्तम प्रतिसाद



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले नव मतदारांचे स्वागत_

अमृता खाकुर्डीकर, पुणे

पुणे: महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्ष, मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहरात आयोजित करण्यात आलेल्या” मतदार नोंदणी मोहीमे”त नवमतदारांचे सहर्ष स्वागत केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहराच्या विविध भागात आयोजित करण्यात आलेल्या मतदार योजनेस उत्तम प्रतिसाद मिळाला असून गोखलेनगर परिसरात कुसाळकर पुतळा येथे आयोजित कार्यक्रमात नुकतीच 18 वर्ष पूर्ण केलेल्या सुमारे 60 नवमतदारांची नावनोंदणी झाली.

या सर्व नवतरूण नवमतदारांचे स्वागत मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनःपूर्वक करून त्यांना शुभेच्छा दिल्या, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र विभाग कार्यालय प्रमुख श्री. योगेश बाचल यांनी दिली. विशेष म्हणजे या मतदार नोंदणीचा शुभारंभ श्री. बाचल यांच्या घरापासूनच करण्यात आला. त्यांची कन्या कु. सिध्दी बाचल हिची प्रथम नावनोंदणी करण्यात आली.

याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस मुरली अण्णा मोहोळ, आमदार सिध्दार्थ शिरोळे, विभाग संघटनमंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, शहर सरचिटणीस दत्ता खाडे, शाम सातपुते, सतिशजी बहिरट, मतदारसंघ अध्यक्ष रवीभाऊ साळेगावकर या मान्यवरांबरोबरच अंजलीताई लोखंडे, रोहीत लिंबोळे,गौतम लोखंडे,व अनेक तरूण कार्यकर्ते उपस्थित होते.

मतदार नोंदणी करण्याचा तरूणांचा उत्साह पाहून निवडणुकीच्यावेळी मतदानाची टक्केवारी वाढवण्यास याची निश्चितच मदत होईल, असे मत उपस्थित पदाधिकारींनी व्यक्त केले. मतदारनोंदणी मोहीमेच्या यशस्वीतेबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles