‘चाहूल थंडीची’ बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील विजेत्यांच्या कविता

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट चौदा🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : चाहूल थंडीची🥀*
*🍂बुधवार : १६ / नोव्हेंबर /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*चाहूल थंडीची*

गेला परती पाऊस
वाढे हवेत गारवा
आला थंडीचा महिना
ॠतु हेमंत बरवा

चला शेकोटी पेटवू
गप्पा गोष्टी ही रंगवू
दाट धुक्याचे सौंदर्य
आठवणी गं साठवू

लागे चाहूल थंडीची
करु स्वागत प्रेमाने
आरोग्यास हितकारी
योगासने नियमाने

गोड गुलाबी स्पर्शाने
आला वसुला बहर
झाडे वेली पाने फुले
प्रफुल्लित चराचर

खुले सकाळी अवनी
शालू हिरवा लेऊनी
भानू अंबरी सजून
वाट काढे धुक्यातुनी

*श्रीमती रुपाली रविंद्र मोरे,* *चोपडा,जि.जळगाव.सदस्या*
*©मराठीचे शिलेदार समूह* .
➿➿➿➿💕🌈💕➿➿➿➿
*चाहूल थंडीची*

आली गुलाबी थंडी
दिवाळीच्या सणाला
चालले सारे पहा
कसे पर्यटनाला||१||

चाहूल थंडीची ही
लागतसे मनास
अशी वाऱ्याची लाट
कशी येई क्षणास||२||

हुडहुडी भरता
आनंद झाला असा
चाहूल गारव्याची
मजा घेतोय कसा||३||

या गुलाबी थंडीची
आली अशी लहर
प्रेमाच्या पालवीचा
सुंदरसा बहर||४||

येता गुलाबी थंडी
प्रेमवर्षाव होई
प्रेमाची फुले अशी
पडती पहा डोई||५||

*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समुह सदस्य*
➿➿➿➿💕🌈💕➿➿➿➿
*चाहूल थंडीची*

चाहूल थंडीची लागताच
मनास होई हुरहूर
हळुवार दाखवी गारवार
मनात झोंबी थंडवार।

गुलाबी हि थंडी निराळी
मनास देई चैतन्य सार
निसर्ग सौंदर्यात भर
दवबिंदूचे पडती सरोवर

झाडाझुडांना येती बहर
पाना फुलांना तेजपन
वेलीवर टवटवीत दिसती
सुंदर पुष्पफुले शोभून

सकाळचा झुळझुळ वारा
स्पर्श करीत मनाच्या गाभाऱ्यात
अंग हे शरारुन जाईत
चाहूल थंडीची लागतात

मौज मस्तीची गुलाबी थंडी
जावे वाटते बाग बगिच्यात
सख्यासवे मनसोक्तपणे
गावे प्रेमाचे मधूर गीत

थंडी अंगात हुरहूर जरी
ह्रदयात चैतन्याची बाग उगवते
मन प्रसन्नचित करी आपुले
शितलतेची सुंदर कळी फुलवते

*सौ पुष्पा डोनीवार ,चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💕🌈💕➿➿➿➿
*चाहूल थंडीची*

हळवीशी, कोवळीशी
जाग दंवाला आली
पाने,फुले,विहगांना
चाहूल थंडीची लागली

किलबिलही पाखरांची
का अशी मंदावली
चोच पंखांत लपवूनी
ती ऊब शोधू लागली

पाकळ्या फुलांच्याही
झळकल्या हिऱ्यांपरी
भिनली लयदार झिंग
माझिया अंगावरी

शाल लपेटुनी अशी
मी धुक्याची अभ्रेस्मी
थंड मदहोश ही हवा
स्पर्श भासतो रेशमी

कुंतलातील दंवफुले
सजणाच्या अधरावरी
बाहुपाशात आज त्या
पहाट जाहली रुपेरी

*रचना ःवृंदा (चित्रा)करमरकर*
सांगली, जिल्हाः सांगली
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿💕🌈💕➿➿➿➿
*चाहूल थंडीची*

चाहूल थंडीची लागता,
मफलर स्वेटर आठवते.
ऊबदार रजई अंगावर घेता,
गुलाबी थंडी, हसून पाहते.

दुधा ऐवजी चहा बरा,
अद्रक,मिरे,विलायचीचा.
हवा -हवासा वाटतो, मज,
कप उकळलेल्या चहाचा.

थंडी ही झोंबणारी,
शेकोटी पेटवावी.
गप्पा -गोष्टीत रमून,
रात्र सारी घालवावी.

सकाळी लवकर उठून,
फेरफटाका मारावा.
काजू -बदामांच्या लाडवांचा,
आस्वाद मनसोक्त घ्यावा.

थंडी ही,बोचणारी,
तरी,वाटते हवीहवीशी.
गारवा वाटे शरीराला,
धड धडी मात्र उराशी.

*मायादेवी गायकवाड (मानवत )परभणी,*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🌈💕➿➿➿➿
*चाहूल थंडीची*

पेटवलेल्या शेकोटीची
ती शान निराळी होती
थोरामोठ्यांची थंडीही
तिथे बसुन जात होती

झाली थंडी सुरु की..!
जंगलात आम्ही जायचे
पडकी झाडे तोडून ती
लाकडे घरी आणायचे

संध्याकाळी पेटवून ती
शेकोटी सर्व शेकायचे
कितीही थंडी असली
तरी उन्हाळाच वाटायचे

मिळत नव्हते कपडेलत्ते
अंथरूण पांघरूण जेंव्हा
लागली थंडी अंगाला की
सहारा गोधळीचा तेंव्हा !

झोपी जात असताना
जेंव्हा थंडी जात नसे
कुडकुडत्या थंडीत त्या
आईबापाची साथ असे

सकाळ झाली कि पुन्हा
सुर्यकिरणात शेकायचे
येरुभर दिवस आला की
शाळेची तयारी करायचे

शाळेतून घरी येताना ती
चाहूल थंडीची लागायची
रस्त्याच्या कडेला पेटवून
शेकोटी थंडीची मजा घ्यायची

*✍️चंदू डोंगरवार अर्जुनी मोर*
*सदस्य मराठीचे शिलेदार समुह*

➿➿➿➿💕🌈💕➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿💕🌈💕➿➿➿➿
*चाहूल थंडीची*

चाहूल थंडीची लागलीय
झोंबतो अंगाला गार वारा
थंडगार लागतं सारं काही
बदलतंय सृष्टीचा नजारा

ऋतुचक्रा प्रमानेचं हिवाळा
आल्हाददायी असला जरी
पहाट प्रहरी उठणाऱ्याच्या
जीवाची मात्र होते बेजारी

थंडीतचं कुडकुडत फडात
जावं लागतं ऊस तोडायला
रात्री अपरात्री गाडी येताचं
झोपेत उठावं गाडी भरायला

वीटभट्टी कामगार पहाटेच
तोडीत चिखल करतो गारा
अंगाअंगाला भिडत असतो
झोंबणारा हवेतील थंड वारा

महावितरणही देतंय चकवा
रात्री बेरात्री लाईट जाते येते
दिनरात कष्टणाऱ्या बळीची
कसोटीची जणू परीक्षा घेते

चाहूल थंडीची लागते जेंव्हा
फुटपाथच्या भिकारी विचारा
कडाक्याची थंडी उघड्यावर
झोपत असेल कसा बिचारा

रजई पांघरूण झोपणाऱ्यास
वेदना कशाला कळेल थंडीची
सुख पायाशी लोळणाऱ्यास
जाण होई आल्हाददायी तिची

*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🌈💕➿➿➿➿
*निकाल वाचून फोटो न पाठवणारे सभासद अनेक आहेत. अशांना डिसेंबर पर्यंत रजा देण्यात येईल*
➿➿➿➿💕🌈💕➿➿➿➿
*चाहूल थंडीची*

चाहूल थंडीची झाली
कसा कुडकुडतो मी आज
सखे तुझ्या ओठांची ऊब दे
नको उबदार कपड्यांचा साज

बांधुन घे ग केस तुझे
झुळझुळ थंड हवा वाहते
चोरून घेतले अंग तू
खिडकीतून तो चंद्र पाहते

ये हळुवार पावलांनी
पैंजणाचाही आवाज नको
फक्त सुगंध वाहू दे गजर्याचा
ये मिठीत, अशी भिवू नको

ही रात्र सखे थंडीची
अन ग्लास भरलेला दुधाचा
तुझे ते लाजून मजकडे पाहणे
अन एक थेंब ओठातून मधाचा

कश्याला आरसा न्याहाळते
धुके साचले थंडीचे
घट्ट मिठीत ये माझ्या
अनुभवू ते क्षण गरमीचे

*डॉ. संजय भानुदास पाचभाई, नागपूर.*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🌈💕➿➿➿➿
*चाहूल थंडीची*

आला थंडीचा महिना
ऋतू हा पारवा…
सकाळच्या धुक्यात
सृष्टीला गारवा….

कामाची लगबग..
शेतकऱ्याची गडबड
पिकं जोमात यावी म्हणून
कष्टाची त्याच्या धडपड

रानमेवा सजला रानोरानी
पक्षांची चंगळ झेप आकाशी
मयुराची जोडी बनी नाचे…
प्रेम गीत बोले गूज वाऱ्याशी

थंडीची चाहूल लागताच
उबदार कपाटही झाली खाली
क्रिसमस बाबा दिसू लागताच
गोजिरवाणी बाळं गोड हसली

मेजवानी ही घराघरात
येवू लागली ताटात….
शरीराच्या ऊर्जेसाठी
गरमागरम भरू लागली पोटात

चाहूल थंडीची लागताच
मनाला थंड गारवा…
कुणाला हवा ..कुणाला नकोसा
पण हा ऋतू जर वर्षी हवा

*सौ.सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🌈💕➿➿➿➿
*चाहूल थंडीची*

हुडहुडी सुटली अंगाला
धावू लागला गार वारा
लागता चाहूल थंडीची
धुक्यात दडे निसर्ग सारा

सर्वांना वाटे हवी हवी
नवलाई ही थंडीची
शाल मफलर स्वेटर
भासते गरज शेकोटीची

गहू हरभरा ज्वारी
डुलती गार वाऱ्यात
छान थंडीच्या पहाटे
दवबिंदू खेळे तृणात

लागे चाहूल थंडीची
वृक्षाची होई पाणगळ
ओलाव्याच्या चादरीत
धरणीची उडे तारांबळ

पशुपक्षी जीवसृष्टी
सारेच गाठरून जाई
गुलाबी थंडीची चाहूल
साऱ्यांना आनंद देई

*कुशल गोविंदराव डरंगे, अमरावती*
*@सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🌈💕➿➿➿
*चाहूल थंडीची*

पहाटवारा थिजून गेला
दुलई धुक्याची उभी
गुरफुटून तिजला आत पहुडला
स्वामी उषेचा नभी

जाग ना आली कलिकेलाही
मिटून पाकळी पाकळी
निशिगंध,चाफ्याची आता
खुलणार कधी ही कळी

फुलांवाचून ही पूजा अधुरी
देवघर पाही वाट
आजीचा तर तडीस जाईना
देवपूजाचा घाट

चाहूल थंडीची लागली
वेगास मंदावले खग
कुणी बसले गिरक्या घेत
सवंगड्यांच्या संग

मॉर्निंग वाॅकचे नित्य चेहरे
मफलरात जात लपले
कसे कळावे कुणास आता
कोण परके..नि आपले..?

क्षितिजावर लालिमा पसरली
उधळून नव नवरंगा
कोवळ्या किरणास बिलगता
शिरशिरी येई अंगा

बचाव करण्या कोमल तनूचा
काढा टोपी,स्वेटर,बंडी
आरोग्यदायी हळूच आली
ही चोरपावली थंडी

*सौ संगिता पांढरे*
*इंदापूर, पुणे*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🌈💕➿➿➿➿
*चाहूल थंडीची*

चाहूल थंडीची लागता,
गहिवरल्या दिशाही दाही
रिमझिम वर्षाची ती फार,
अडसर मध्येच येणार नाही

होईल सांज लवकर आता,
माय घरी लवकर येई
ताप सूर्याचा तो समस्ता,
ऊब प्राणी मात्रा देई

भर पावसात असो की,
उन्ह तापलेली भारी
ऊर्जा वजा होणार नाही,
आहे शितलतेची वारी

चाहूल थंडीची लागली,
धष्टपुष्ट होती कंदमुळे
मिळता सकस आहार
करिती रोगजंतू लुळे

ऊब बिछाण्याची ओर
जशी आंबट अन् गोड
निद्रा होय अशी प्रसन्न
झोपी स्वप्नांची ती होड

रात्र भासे असे तास ,
मिनिटांचे सेकंद व्हावे
दव पानावरती जसे,
हाती मोती जणू विसावे

महिमा गुलाबी थंडीची,
सर्व जीवांना ती भावे
होते हुडहुड काही वेळ,
तिचे लाभ कुणा न ठावे ??

करू स्वागत तयाचे ,
नाचू आनंदी मनाने
चाहूल थंडीची लागली
सुख वेचू कणाकणाने

*जितेंद्र ठवकर*
अर्जुनी/मोर, जिल्हा – गोंदिया
*©सदस्य – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🌈💕➿➿➿➿
*चाहूल थंडीची*

चाहूल थंडीची लागता
मनी होई हर्ष फार
चार महिने थंडीचा मौसम
येती मनात वेगवेगळे विचार

संध्येला पटकन निजणे
मात्र सकाळी उशिरा उठणे
बाहुपाशात आवळणे
मिठी कधी ना सैल सोडणे

हिंडणे-फिरणे,पर्यटन
सर्वांसाठी आनंदाचे क्षण
थंडीचा आनंद घेई प्रत्येक जन
आंतर-बाह्य उत्साही मन

गुलाबी थंडीत
येते गालावर लाली
सृष्टी असते यौवनात
जणु दव मधुरस प्याली

नवविवाहितांसाठी
हा असतो पर्वणी काळ
प्रेम प्रसंगही चालती
असो प्रभात वा संध्याकाळ

जीव-जनांवरा सर्वांशी
शीतऋतु लाभकारी
स्वेटर,मफलर काढा आता
लागली चाहूल थंडीची भारी

*पंकज रामकृष्ण चारथळ*
कोराडी रोड नागपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🌈💕➿➿➿➿
*चाहूल थंडीची*

लागताच चाहूल थंडीची
वाटे हवासा स्पर्श उबदार
झोंबता वारा सय चहाची
शेकोट्या पेटती दारोदार

रंगती गप्पा चावट रे भारी
कानं टवकारी लालसेपोटी
सांगा सांगी रे करती सारी
प्रश्नच नसे रे खरं की खोटी

गावभर होई गुपीत सारे
डंका वाजता थोबाड वासे
रडण्याचं रे नाही कारण
विश्वासार्थ काय ठेवी तारण

चाहूल थंडीची काटे रे अंगी
उबदार कपडे स्वागत जंगी
स्वेटर,रजई,मफलर नि टोपी
काठी आपटत येई बहुरूपी

ऊन , पाऊस लागतो आसरा
बोचरी थंडी लावूया कासरा ?
दसरा झाला संक्रांत येईल
हृदयीचा गोडवा वाढत जाईल

हृदयीचा गोडवा वाढत जाईल

*श्री.संग्राम कुमठेकर*
*मु.पो.कुमठा (बु.)*
*ता.अहमदपूर जि.लातूर*
*सहप्रशासक/परीक्षक/संकलक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles