‘न्यू मून’ शाळेत बालक दिन उत्साहात

‘न्यू मून’ शाळेत बालक दिन उत्साहात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रा. तारका रूखमोडे, गोंदिया (प्रतिनिधी)

अर्जुनी/ मोर: स्थानिक -न्यू मून इंग्लिश मिडियम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज अर्जुनी मोर. येथे दिनांक 14 /11 /2022 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती ‘बालक दिन’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.

आयोजित कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका तारका रुखमोडे व प्रा. कापगते यांनी दीप प्रज्वलन करून प्रतिमेला माल्यार्पण केले. बालक दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शुभेच्छापत्र बनवणे, गीत गायन व उत्स्फूर्त भाषण स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राध्यापिका तारका रुखमोडेे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की नेहरूंना मुले देशाचा आधारस्तंभ वाटायची, त्यांची जडणघडण सुंदर पद्धतीने व्हावी म्हणून लहान मुलांच्या कल्याणासाठी त्यांनी परिश्रमरुपी कार्य केले.त्यांनी भारताची लोकशाही सुरक्षित केली, आणि जातीय गृहयुद्ध रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला, स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीत त्यांनी विज्ञाननिष्ठ व मानवतावादी दृष्टिकोन अबाधित ठेवला, भारतात सोव्हियत पद्धतीचा समाजवाद आणणे अशक्य होते म्हणून त्यांनी कल्याणकारी राज्यव्यवस्थेचा स्वीकार केला. ते अद्वितीय कुशल राजनीतीज्ञ होते, खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे शिल्पकार होते. मानवाच्या मुक्तीप्रति त्यांची सेवा सदैव चिरस्मरणात राहील. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक अध्यक्षा तारका रुखमोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिना चचाने यांनी करून आभार मानले व त्रिवेणी थेर यांनी पं नेहरूंविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. राकेश उंदीरवाडे, कुंजना बडवाईक, श्री बांडे, हिना लांजेवार, प्रतीक्षा राऊत, शिला बोरीकर यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles