निसर्गाच्या जवळ घेऊन जाणा-या कथा ” फुले आणि परीराणी’ – शुभांगी दामले

निसर्गाच्या जवळ घेऊन जाणा-या कथा ” फुले आणि परीराणी’ – शुभांगी दामले



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, पुणे

पुणे: “बालसाहित्याला पोषक अशी सहजसोपी लेखनशैली, निवेदनातली चित्रमयता आणि मुलांना निर्सगाच्या जवळ घेऊन जाण्याचे सामर्थ्य असलेले ‘ फुले आणि परीराणी’ हे पुस्तक मुलांना खूप आवडेल, अशाच सुंदर रूपात सिध्द झाले आहे. लेखिका संजीवनी बोकील या स्वतः विद्यार्थ्यांमध्ये रमणा-या शिक्षिका असल्याने त्यांना लहान मुलांच्या भावविश्वाचे उत्तम भान आहे. तेच या पुस्तकात प्रतिबिंबीत झालेले दिसते… ” असे मत सुप्रसिध्द ज्येष्ठ अभिनेत्री आणि सुदर्शन रंगमंचाच्या संचालिका श्रीमती शुभांगी दामले यांनी “फुले आणि परीराणी’ या बालकथा संग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना व्यक्त केले. त्यांच्या शुभहस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा,श्रीमती
रेखा पळशीकर आणि दिलीपराज प्रकाशनाचे संचालक श्री. मधुर बर्वे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बालदिनाचा मुहूर्त साधून मुलांसाठी लिहीलेल्या बालकथांचा हा संग्रह “हुजूरपागा” या पुण्यातल्या नामवंत शाळेने समारंभपूर्वक प्रकाशित केला. कारण या पुस्तकाच्या लेखिका,प्रसिध्द कवयित्री संजीवनी बोकील या ‘हुजूरपागा’ शाळेच्या माजी विद्यार्थिनी असून अभिनेत्री शुभांगी दामले या सुध्दा शाळेच्या माजी विद्यार्थिनी असल्याने त्यांच्या शुभहस्ते प्रकाशन समारंभ आयोजित करण्याचे औचित्य साधण्यात आले.
पुण्यातली ‘हुजूरपागा’ ही मुलींची शाळा विद्यार्थिनींच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसिध्द अशी नावाजलेली संस्था आहे. आजच्या प्रसिध्द कवयित्री,लेखिका संजीवनी बोकील या हुजूरपागेत सातवी ईयत्तेत असताना त्यांनी पहिली कथा लिहिली होती. ती गोड स्मृती जागवण्यासाठी बालदिनाचा मुहूर्त साधून संजीवनी बोकील यांच्या या चोविसाव्या पुस्तकाचा प्रकाशनसोहळा शाळेने खास आयोजित केला होता. विशेष म्हणजे इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी अन्य मान्यवरांसोबतच विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होत्या.
संजीवनी बोकील यांचे “फुले आणि परीराणी” हे
पुस्तक दिलीपराज प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केले असून लहान मुलांना गंमतीदार वाटेल अशा विशेष कल्पकतेने आणि आकर्षक पध्दतीने पुस्तक प्रकाशन करण्यात आले. मंचावर एक सुंदरशी परीराणी पेटी घेऊन अवतरली..तिने जादूची कांडी फिरवली आणि पेटीतून प्रकट झाले ‘ फुले आणि परीराणी’ पुस्तक! या जादूमय आभासाच्या अभिनव प्रयोगाला टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी दाद दिली.
या प्रसंगी बोलताना शुभांगी दामले यांनी आपल्या जडणघडणीत हुजूरपागा शाळेचे योगदान अधोरेखित केले. संजीवनी बोकील यांच्या कथा संग्रहातील कथांबद्दल गौरवोद्गार काढताना त्या म्हणाल्या की, “संजीवनी यांच्या लेखनातील शब्दचित्र शैली मोहक असून त्यादृष्टीने त्यांनी आता मुलांसाठी नाटुकले लिहावे, मी ते स्वतः दिग्दर्शित करून मंचावर सादर करीन”. शुभांगीताईंच्या या आश्वसनाने सर्वांनी आनंद व्यक्त केला.
श्रीमती बोकील यांनी यावेळी शाळेतील मुलींशी अर्थपूर्ण संवाद साधला. त्या म्हणाल्या,
” मुलींनो, खूप वाचन करा; वाचनातूनच लिहावंसं वाटू लागेल. लिहिणं, म्हणजे नवी सृष्टी निर्माण करण्याची सिद्धी लाभणं, स्वतः विश्वकर्मा होण्याचा आनंद घेता आला पाहिजे.वाचनामुळे कल्पनाशक्ती विकसित होते, नव्या जाणिवा जाग्या होतात आणि जीवनाकडे बघायची एक नजर तयार होते”
श्रीमती रेखा पळशीकर आणि श्री.मधुर बर्वे यांनी याषप्रसंगक मनोगत व्यक्त करून मुलींना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि संजीवनी बोकील यांचे 24 व्या पुस्तकसिध्दीबद्दल अभिनंदन केले.
‘ फुले आणि परीराणी’ या पुस्तकातील कथांची कथाकथन स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात विजयी ठरलेल्या तीन स्पर्धकांना संजीवनी बोकील यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
संस्थेचे सचिव श्री. कट्टी, इतर पदाधिकारी, प्रा.सुप्रिया अत्रे, प्रा. वैजयंती चिपळोणकर, प्रा. प्राजक्ता वैद्य आणि शाळेचा शिक्षकवृंद कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित होता. पर्यवेक्षिका श्रीमती फलटणे यांच्या आभार प्रदर्शनाने या सुंदर सोहळ्याची सांगता झाली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles