भर सभेत नितीन गडकरींना आली चक्कर; तब्बेत बिघडली
कोलकाता: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची अचानक तब्येत बिघडली आहे. येथील एका सभेला संबोधित करताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे कार्यक्रम थांबवावा लागला.
सिलिगुडी मधील कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरींचे शुगर प्रमाण कमी झाली होती. तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून नितीन गडकरी यांच्यावर उपचार सध्या सुरू आहे. नितीन गडकरी यांची ECG केलं जाणार आहे. सध्या नितीन गडकरी यांची प्रकृती स्थिर आहे.