ट्विटरचा नवा बॉस कोण असणार?

ट्विटरचा नवा बॉस कोण असणार?पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई : कर्मचार्‍यांची कपात, कंपनीच्या पॉलिसीतील मोठे बदल आणि ट्विटरमधील अनेक वादग्रस्त निर्णयांनंतर आता अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांनी ट्विटरला लवकरच नवा बॉस मिळणार असल्याचं म्हटलं आहे, कारण ते कंपनीतील आपला वेळ कमी करणार आहे. एलॉन मस्क म्हणाले की, आता ते ट्विटर चालवण्यासाठी नवीन लीडरच्या शोधात आहेत.

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे की, “अधिग्रहणानंतर कंपनीची पुनर्रचना करण्यासाठी नवीन उपक्रम सुरू करण्याची गरज आहे. पण मला ट्विटरवरील माझा वेळ कमी करायचा आहे. एलॉन मस्क यांनी हे देखील मान्य केलं की काही टेस्ला इंजिनियर ट्विटरच्या अभियांत्रिकी संघांना मदत करत होते.

एलॉन मस्क यांना हवंय नवं मॅनेजमेंट-

मस्क यांनी बुधवारी सांगितलं की, ते ट्विटरची पुनर्रचना लवकरच पूर्ण करतील, अशी त्यांना आशा आहे. किंबहुना अधिग्रहणानंतर लगेचच मस्क यांनी कंपनीचे पूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढून टाकलं. त्याचबरोबर कंपनीच्या वाढत्या खर्चामुळं आणि खर्चात कपात करण्यासाठी 3700 कर्मचाऱ्यांनाही कंपनीतून कार्यमुक्त करण्यात आलं.

या निर्णयांमुळे एलॉन मस्क जगभरातील टीकाकारांच्या निशाण्यावर आले होते. मात्र, स्वत:चा बचाव करताना ते म्हणाले की, दुर्दैवानं माझ्याकडे पर्याय नव्हता. कारण कंपनीला दिवसाला 4 दशलक्ष डॉलर तोटा होत होता. त्यामुळं आम्हाला टाळेबंदीसारखा कठोर निर्णय घेणं भाग पडलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles