नवभारत विद्यालयातील शिक्षिका ‘वर्षा भांडारकर’ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व साहित्य गंध पुरस्काराने सन्मानित

नवभारत विद्यालयातील शिक्षिका ‘वर्षा भांडारकर’ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व साहित्य गंध पुरस्काराने सन्मानित



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

चंद्रपूर/ मूल: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे आयोजित ‘साहित्यगंध दीपोत्सव प्रकाशन समारंभ 2022’ नुकताच लातूर येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला. तसेच राज्यातील अनेक कवी व कवयित्री इ.च्या उपस्थित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, साहित्य गंध , शैक्षणिक जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा व कवी संमेलन सोहळा उत्साहात पार पडला.

या समारंभाच्या अध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड सिलवासाच्या प्रदेशाध्यक्षा शिवमती सविता पाटील ठाकरे, उद्घघाटक मा.सुनिल गायकवाड माजी खासदार, मार्गदर्शक ज्येष्ठ साहित्यिक माजी प्राचार्य डॉ.माधव गादेकर, तसेच संस्थापक मा.राहुल पाटील व राज्यस्तरीय कवी संमेलनाच्या अध्यक्षा शर्मिला देशमुख घुमरे यांच्या हस्ते च़द्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात असलेल्या नवभारत विद्यालयाच्या शिक्षिका वर्षा सुभाष भांडारकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व साहित्य गंध पुरस्कार देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले.

‘वर्षाव प्रेमाचा’ या कविता संग्रहाच्या कवयित्री वर्षा भांडारकर यांचं साहित्य लेखन व उत्तम शैक्षणिक कामगिरी व पर्यावरणाचं उत्तम कार्य लक्षात घेऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, मानपत्र, मेडल दीपोत्सव अंक देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्याचे आयोजन संग्राम कुमठेकर व त्यांच्या टीमने केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन संग्राम कुमठेकर व प्रशांत ठाकरे सर यांनी केले. तर आभार मुख्य परीक्षक व ज्येष्ठ कवयित्री वैशाली अंड्रस्कर, चंद्रपूर यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles