गोंडवाना गणतंत्र पार्टीतर्फे बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात

गोंडवाना गणतंत्र पार्टीतर्फे बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_आदिवासी समाज आजही अंधारातच_

नागपूर: आदिवासी समाजाचे क्रांतिकारक ओळखले जाणारे बिरसा मुंडा आदिवासी समाजक्रांतीचे जनक व आद्य क्रांतिकारक अपनी धरती, अपना राज, जल, जंगल, जमिनीसाठी इंग्रजाविरोधात विद्रोह केला. क्रांतिकारक बिरसा मुंडा एक भारतीय क्रांतिकारक होते बिरसा मुंडा यांनी समाजासाठी स्वातंत्र्य लढ्यासाठी महत्वपूर्ण देशासाठी योगदान दिले म्हणून देशात दरवर्षी १५ नोव्हेंबर ला मोठ्या जल्लोषात जयंती साजरी करण्यात आली.

बिरसा मुंडा यांच्या १४७ व्या जयंती निमित्ताने गोंडवाना गणतंत्र पार्टीचे समस्त पदाधिकारी, आदिवासी नगर, उदय नगर, गोंडराजे विरेंद्र शहा ऊईके, राजे वासुदेव शहा टेकाम राष्ट्रीय उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पांजली अर्पित करून अभिवादन करण्यात आले. गोंडराजे विरेंद्र शहा ऊईके यांच्या हस्ते गोंडी सप्तरंगी ध्वजारोहण करण्यात आले. बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याचा उद्बोधन कार्यक्रम आर.डी.आतराम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी मंचावर तिरु.सुधाकरजी आतराम महासचिव गोंगपा, राजेश इरपाते युवा प्रदेशाध्यक्ष, दिनेश सिडाम शहर अध्यक्ष, गंगाताई टेकाम जिल्हा अध्यक्षा, शिला ताई मर्सकोल्हे, शितल ताई मडावी, सुनंदाताई घोडाम, मुक्ताताई गेडाम, मुक्ताताई काटोले, विजय काटोले, प्रविण मडावी युवा उपाध्यक्ष, सौरभ मसराम जिल्हा युवा उपाध्यक्ष, राजेश पेंदाम शहर संघटक, सेवाराम टेकाम (गोंगपा) मनोज धुर्वे (गोंगपा) व कार्यक्रमात सहभागी समाज उपस्थित होते. बिरसा मुंडा यांच्या गौरवशाली जीवनाला त्यांचे कार्य आत्मसात करणे फार आवश्यक आहे.

जरी देशात ७५ वा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला असला तरी आजही आदिवासी समाज अंधारात आहे. आताही त्यांच्यावर जुलमी अत्याचार होत आहे. आणि हे अत्याचार थांबविण्यासाठी आपल्याला पुन्हा पिवळ्या क्रांतीमधून व पिवळ्या क्रांतीच्या माध्यमातून चळवळ करुन थांबवायचे आहे. असे जिल्हा अध्यक्षांनी असे समाजाला आवाहन केले आहे. आदिवासी समाज हे देशाचे मूल निवासी आहेच व त्यांचे मुलभुत अधिकार त्यांना मिळालेच पाहीजे. असे सरकार ला म्हटले आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रिष्णा सरोते, अशोक पोयाम, गणेश परतेकी, रवि घोडाम, विरेंद्र ऊईके, इश्वर नैताम, शैलेश कोटनायके, नाना नैताम, राहुल कोवे, प्रशांत उईके, वैभव मसराम, शुभम मसराम, सचिन पोयाम, सुरज कुडमेथे, ऊईके, विक्की घोडाम, जिवन घोडाम, विजय काटोले, बेबी ताई कोवे, सत्यफुला बाई ऊईके, आशाताई कुडमेथे, रंजना ताई सरोते, अहिल्याबाई आतराम, अल्का आतराम, संगिता परतीके, सुनंदा घोडाम, शितल मसराम, सरस्वती भलावी, नलिनी निंबाळकर, मुक्ता काटोले, मंगला धुर्वे आयोजक आदिवासी नगर गोंगपा व आदींनी परिश्रम घेतले. संचालन हर्षल सिरसाम यांनी केले व प्रास्ताविक विजय आतराम व आभार हिमांशु धुर्वे यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles