शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : संविधान एक हक्क☄*
*🍂शनिवार : २६/ नोव्हेंबर /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*आदर्श वाचक विजेत्यांचे सर्वप्रथम अभिनंदन*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*संविधान एक हक्क*

भारतीय संविधान हा
आमुचा अभिमान
भारतीय स्वातंत्र्याचा
हाच असे सन्मान

समानतेचा हक्क दिला
भारतीय जनतेला
विविधतेतून ऐक्य जपूनी
जागृत केले मानवतेला

महामानवे रचला पाया
भारतीय संविधानाचा
अखिल जगी डंका वाजे
आपुल्या राज्य घटनेचा

संविधान शान आपुली
हक्कांचे देतसे भान
कायद्याने दिले रक्षण
नी कर्तव्याचीही जाण

फुले- शाहू -आंबेडकर
ही विचार-धारा रुजली
देशाच्या कणांकणांत
लोकशाही ही भिनली

संविधान एक हक्क
संविधान महान शक्ती
धर्माचे स्वातंत्र्य तेची
देतसे सर्वा अभिव्यक्ती

संविधान दिन करु साजरा
जनाजनांत जागवू बंधुता
आत्मज्योती उजळून मनी
विलसे अपूर्व तेजोमयता

*रचना ःवृंदा(चित्रा)करमरकर*
सांगली जिल्हा: सांगली.
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🌐🔆🌐➿➿➿
*संविधान एक हक्क*

जात धर्म पंथ वर्ण
एका धाग्यात गुंफले
असे पुण्य संविधान
साहेबांनी ते रचले

संविधान एक हक्क
प्रत्येकाचा स्वाभिमान
न्याय बंधुता समता
भारताचा अभिमान

जगी मोठं संविधान
कायद्याची ही चौकट
सर्व प्रश्नांचे उत्तर
असो कसले संकट

उच्च नीच भेदाभेद
सारे बाजूला सारले
संविधान एक हक्क
भारताला सावरले

वाचू समजून घेऊ
नको करू अपमान
देऊ आता एक नारा
घरोघरी संविधान

*कुशल गोविंदराव डरंगे,अमरावती*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌐🔆🌐➿➿➿➿
*संविधान एक हक्क*

एक ज्ञानज्योत लावली डाॅ. आंबेडकरांनी
नमन त्या सूर्यासमान तेजाला
ज्योतीच्या दिव्य तेजाने त्यांच्याच
अज्ञानरूपी अंधार दूर केला नमन तयाला….

दिनरात अभ्यास कसून खूप केला
समाजात कर्तृत्त्वाचा मान मिळवला
शिकण्याच्या जिद्दिला सलाम त्यांच्या
जातीभेद तोडूनी सत्याचा मार्ग दाखवला….

रमाबाईंच्या साथीनं समाज घडवला
अंधश्रद्धा,गुलामगिरीला कात्री लावली
भारतात एकजूट निर्माण केली यांनी
नवसूर्याची कीर्ति अजरामर राहिली….

अशा अजरामर तेजाने तळपलाभीम
माणूसकिचा धडा समाजाला शिकवला
“राज्यघटनेचा शिल्पकार”हा मानाचा
किताब बॅरिस्टर होवूनी मिळवला……

मूक समाजाचा नायक आपण
ज्ञानमयी प्रकाश दिला आंबेडकरांनी
नमन करुया सारे या महा मानवाला
झळकतो आज भारत सारा दिव्यतेजांनी…

संविधान एक हक्क आहे मानवाचा
बोद्धमय विचारांचे लेणं आपण लेवू
डाॅ.आंबेडकरांचा कित्ता आपण अंगिकारू
सर्वधर्म समभाव हा धडा स्मरणी ठेवू…

*वसुधा नाईक,पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌐🔆🌐➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*संविधान एक हक्क*

२६ नोव्हेंबर संविधान दिवस
हा राज्य घटनेचा बहुमान
संपूर्ण देशात करून जनजागृती
वाढवू बाबा साहेबांचा मान

बाबाने दिले एक अनमोल रतन
चला करूया त्यांचे जतन
करूया जनजागृती गावा गावात
होईल सर्वांचे अमृतमय जिवन

संविधान दिनाचे औचित्य साधून
करू लागले विविध कार्यक्रम
जनजागृती व्हावी सर्वत्र
राबवू लागले विविध उपक्रम

भारताच्या स्वतंत्र राज्यघटनेने
दिले सर्वांना समान अधिकार
अन्यायाचा विरूद्ध लढून
करण्या अन्यायाचा प्रतिकार

मूलभूत अधीकार दिले घटनेने
आनंदमय जिवन जगण्याला
संविधान एक हक्क आमचा
हा अधिकार मिळाला सर्वाला

अंधकाराला दूर करा
प्रकाशाचा मार्ग धरा
बंधुभावाने वागवा सर्वांना
तरच सुरळीत चालेल जिवनधारा

घटनेचे करू नका अपमान
तीच भारत देशाची शान
बाबाने दिलेले अनमोल ठेवा
आबाद ठेवेल सर्वांचे जीवन

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌐🔆🌐➿➿➿➿
*संविधान एक हक्क*

अभिमान आहे आम्हा
भारतीय संविधानाचा
स्वातंत्र्य समता बंधूत्व
मंत्र मानवी अभिमानाचा

करतो हक्काची पेरणी
देतो हक्क शिक्षणाचा
सकस आणि दर्जेदार
करतो विकास मनाचा

उपलब्धता असे यामुळे
समान दर्जाची अन् संधीची
मिळते लढण्याचे बळ
आली वेळच जर मंदीची

संविधान समजण्यासाठी
आधी कोळून प्यावे लागते
मनामनात जनाजनात आधी
उद्देशिकेची पेरणी करावी लागते

संविधान एक हक्क फक्त
बोलायची गोष्ट नाही
अमलात आणावे लागेल
तेव्हाच देश एकसंघ राही

*सविता धमगाये,नागपूर*
जि. नागपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌐🔆🌐➿➿➿➿
*संविधान एक हक्क*

संविधान एक हक्क ठसवा
मतदान एक हक्क बजवा
घटनेचे मूल्य परिशिष्ट जाणा
कणखर करा लोकशाही बाणा !!

दोन वर्ष अठरा महिने
सतरा दिस पाव खाऊन
अधिकृत झाले संविधान
राज्य करा हो माझ्या भिमाची
घटना पाहून !!

भाषण स्वातंत्र्य अभिव्यक्ती
विधान मांडण्याची नाही सक्ती
शिकुन सारे संघटित व्हा
चारित्र्य शिलाने प्रतिभावंत व्हा !!

सर्वधर्म समभाव रुजवा
संविधानिक झेंडा रोवा
न्याय बंधूता समतेचा
नाश करा रे विषमतेचा !!

संविधान एक हक्क जिनेका
मनुस्मृतीचे दहन करुन ऐका
प्रज्ञासूर्याने धिक्कारुनी गुलामीला
माणूसपण दिधले बहुजनाला !!

*प.सु. किन्हेकर, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌐🔆🌐➿➿➿➿
*संविधान एक हक्क*

भारतीय संविधान विधात्या
प्रणाम तव दूरदृष्टीपणाला
लोकशाहीचे लोकहिताचे
संविधान अर्पिले देशाला

वर्णव्यवस्थेत जखडबंद
गुलामीत खितपत पडलेले
अंधकारमय जिवन ज्यांचे
संविधानाने प्रकाशात आले

विषमतेला झुगारुन येथे
समतेने नटवले भारताला
स्वातंत्र्य समता न्याय बंधुता
मूल्ये रुजविले जनतेला

अधिकार अन् कर्तव्याची
सांगड घालून जाणिवांची
संधी नामी सामान्य जना
उज्ज्वल भविष्य घडण्याची

पारायणे घडावी येथेही
संविधानाच्या वाचनाची
जाती धर्म एकत्र होऊनी
संधी लाभावी ऐकण्याची

शोषणा पासून संरक्षणाचा
स्वातंत्र्य हक्क अभिव्यक्तीचा
शैक्षणिक हक्क तो सर्वांना
सामाजिक,राजनैतिक न्यायाचा

संविधान एक हक्क आहे
स्वातंत्र भारतीय नागरिकांचा
प्रस्ताविकेत सार सामावले
26 नोव्हेंबर दिन भाग्याचा

संविधान दिन चिरायू होवो !
शुभेच्छा या दिनी सर्वांला
श्रेष्ठ जगी संविधान लिहिले
कोटी प्रणाम’बा’तुम्हाला

*✍️बि.एस.गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌐🔆🌐➿➿➿➿
*संविधान एक हक्क*

समता न्याय अन् बंधूता
राहावी टिकून समानता
संविधान एक हक्क अमुचा
नाही कोणी लहान मोठा

विविध धर्म परंपरा ती
अन् चातुरवर्ण होती रित
मनुस्म्रुतीचा राज कसा
सर्वत्र भेदाभेद होता

पारतंत्र्यात देश होता
भारत इंग्रजांचा गुलाम होता
माणूस म्हणून जगताना
माणसापासून माणूस दूर होता

इंग्रजी राजवटीतून देशाची
कशीबशी सुटका झाली
पण या देशातील माणसाची
माणूसकी कुठे हरवून गेली

स्वातंत्र्य मिळाले देशाला
अन् माणूस गुलाम राहिला
कसे स्वातंत्र्य या देशाचे
माणसाला माणूस दुरावला

स्वतंत्र भारताची आदर्श
एक राज्यघटना असावी
लिहीणार कोण प्रश्न पडला
बाबासाहेबांवर जबाबदारी आली

संविधानाचे शिल्पकार झाले
अशी राज्य घटना लिहिली
संविधान एक हक्क आहे
सर्वांना याची जाणीव झाली

*✍️चंदू डोंगरवार अर्जुनी मोर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌐🔆🌐➿➿➿➿
*संविधान एक हक्क*

प्रश्न पडला माझ्या मनी
मी आता हे कसे साहू ?
पण तूच केले यातून मोकळे
संविधाना’ तुझ्या बाबतीत काय लिहू ?’

जगत होतो गुलाम म्हणून
पण तुच जागविला स्वाभिमान
आरं, तुझ्या बाबतीत काय लिहू?
खरच ! वाटतो रे तुझा अभिमान

तुझ्यामुळेच उभ्या जगात
या भारताची ताट मान !
तुझ्या बाबतीत काय लिहू ?
अरे ! तू तर देशाचा प्राण !

तुझ्या आधी जीवन आमचे
होते नगण्य आणि काडीमोल
संविधाना, तुझ्यामुळेच ठरलो रे
जीवनात आम्ही अनमोल.

जिवंतपणीच मरण यातना
दिल्या होत्या मनूवाद्यांनी
पण, बाबासाहेबांची पुण्याई
म्हणून वाचलो, संविधानानी

ऐकलं होतं बरंच काही
मनुवादी हे बहुजनांचे भक्षक

पण,..काय लिहू तुझ्या बाबतीत ?
संविधाना,तूच तर आमचा रक्षक !

सविधाना, ! तू फक्त ग्रंथ नाहीस
देशद्रोह्यांचा खत्मा आहेस
तुझ्या बाबतीत काय लिहू ?
आरं, तू तर देशाची आत्मा आहेस!

स्वातंत्र्य समता बंधुता
संदेश मानवतां दिला महान
पारतंत्र्यातून सुटका करून
कर्तव्याचे ठेवले भान

जगाच्या पाठीवर नसेल
एवढी इथे विविधता आहे
संविधाना, तुझ्यामुळेच तर
नांदत इथे एकता आहे.

संविधाना, …
तुझ्या कोडबिलात सोडविला
महिलांच्या सुट्ट्यांचा प्रश्न
बारावरून आठ तास केले
आता मजूरही करतात जश्न

संविधान एक हक्क आहे
समानतेने वागविणारा
गुलामांना चैतन्य देऊन
उत्स्फूर्ततेने जागविणारा

नकळत दोन्ही कर जोडूनी
मनापासूनी करतो सलाम
आरं , काय लिहू रे तुझ्या बाबतीत?
जय भारत जय संविधान !
जय भारत जय संविधान !

*प्रा.दिनकर झाडे , गडचांदूर. जिल्हा : चंद्रपूर.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌐🔆🌐➿➿➿➿
*संविधान एक हकाक*

किती सुंदरसा असे
आज‌ दिन सोनियाचा
सारे मिळूनिया करू
जागर संविधानाचा||१||

साऱ्या जनतेस दिला
असा जगण्याचा हक्क
त्यांचे प्रयत्न पाहूनी
सारे झाले असे थक्क||२||

थोर माझे भीमराव
ज्यांनी घटना रचली
त्यांच्या प्रयत्नांनी अशी
किमयाही साकारली||३||

आहे दिस अनमोल
चला करुया जागर
संविधानाचा रहावा
मनी सर्वांच्या आदर||४||

दिन आजचाच खास
गातो सारे गुणगान
बहुमोल संविधान
खूप आहेच महान||५||

संविधान एक हकक
साऱ्या जनतेचा असे
हर एक नागरिकांमध्ये
सुंदर संविधान वसे||६||

*विनायक कृष्णराव पाटील‌ बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समुह सदस्य*
➿➿➿➿🌐🔆🌐➿➿➿➿
*संविधान एक हक्क*

संविधान आत्मा देशाचा
गरीबाचा, श्रीमंतांचा,
सामान्य असामान्य मानवाचा
शासनसंहिता,अनुशासिता,
नियम कायद्याचा.
संविधान एक हक्क
हक्क न्यायाचा, हक्क स्वातंत्र्याचा,
हक्क समतेचा, हक्क बंधुतेचा,
हक्क देशाला समाजवादी करण्याचा
हक्क देशाला धर्मनिरपेक्ष गणराज्य बनविण्याचा
हक्क लोकशाही मार्ग अवलंबण्याचा
संविधान एक हक्क
हक्क स्वतंत्रपणे वागण्याचा ना कि स्वैराचाराचा
हक्क व्यक्तीने पुरोगामी बनण्याचा
हक्क विचारांच्या अभिव्यक्तीचा
सतत टिकास्त्र सोडून इतरांना दुखविण्याचा नव्हे
संविधानाने हक्क दिले,
सम्यक विचारांनी देशाला घडविण्यासाठी
प्रत्येक व्यक्तीला सुजाण नागरिक बनण्यासाठी
आपण घडवतो ना देश?
नाहीतर आम्ही बि घडलो, तुम्ही बि घडा
म्हणत पायमल्ली होणार नाही ना देशाची?
आठवतात ना शब्द-अत्त दीप भवं
तुम्ही स्वतः चे दीपक बनले की
राष्ट्राच्या विकासवाटा उजाडणार
उजाडत राहणार
कायमच्या….

*कु.एस.पी.रामटेके*
सडक अर्जुनी गोंदिया
*©सदस्या -मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌐🔆🌐➿➿➿➿
*संविधान एक हक्क*

हक्क आणि कर्तव्य
एकाच नाण्याच्या दोन बाजू
एकाची उणीव भासली तर
गोल मोल होईल तराजू

संविधान एक हक्क आहे
कर्तव्याची पण जाण असावी,
घटनेवर अंमल करताना
डॉ, आंबेडकरांची विद्वता स्मरावी.

भारतीय लोकशाही आहे आमुची ,जीव की प्राण
स्वतः ची पर्वा कधी न करता
वाढवू तिची जना- मनात शान

संविधान आहे आपले सुरक्षा कवच
जपून त्यास अंगीकारावे
चुकूनही त्यास होऊ नये छेद
या साठी जागरूक सदा असावे

बहाल केले,भाषण स्वातंत्र्य सर्वांना
करू,प्रसार देश हितासाठी
यशाची उतुंग शिखरें चढताना
देह झिजवू जण कल्याणासाठी

*मायादेवी गायकवाड (मानवत )परभणी,*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🌐🔆🌐➿➿➿➿
*संविधान एक हक्क*

क्रांतीसूर्य बा भीमामुळे
माणूस म्हणून जगताना
हक्काचे हे सुरक्षाकवच
संविधानाकडे रे बघताना

जाणीव कधी रे होईल ?
संविधान एक हक्क पण
हक्क हिरावला जाईल
तेव्हा निरूपयोगी हे धन

मान,सन्मान नि प्रतिष्ठा
मिळाली रे संविधानामुळे
अस्पृश्य तू वाहून विष्ठा
गुलाम तूच मनुस्मृतीमुळे

प्रज्ञासूर्य रे भीमबाबांची
त्याग,समर्पण व चिकाटी
निर्मिती या संविधानाची
बंदच रे मनुवादी दमदाटी

संविधान एक हक्क खरा
गोडीने दुष्ट उगवतील सूड
वाहतोय रे प्रगतीचा झरा
गाफीलक्षणी सोलतील बूड

फाजील विश्वास आत्मघाती
बंद करतील रे प्रकाशवाटा
चेतवशील जर तू ज्ञानज्योती
तेव्हाच उसळतील भीमलाटा

तेव्हाच उसळतील भीमलाटा

✍️ *श्री.संग्राम कुमठेकर*
*मु.पो.कुमठा (बु.)*
*ता.अहमदपूर जि.लातूर*
*सहप्रशासक/परीक्षक/संकलक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌐🔆🌐➿➿➿➿
*संविधान एक हक्क*

उजळून निघाल्या दिशा दाही
स्वातंत्र्याची होता पहाट….
कैक दिसांनी दिसे मोकळे आकाश
चढून आल्यावरती अवघड घाट…||

यज्ञकुंडात गेल्या किती आहुत्या
तरण्याताठ्या नवयौवनाच्या…
उजडून गेली किती घरेदारे नि
खुणा पुसल्या किती सौभाग्याच्या…||

साऱ्यामधुनी सार निघाले
लोकशाहीचे मंदिर उभारले…
संविधानाच्या निर्मितीतूनी
जगात साऱ्या लौकीक पावले…||

विद्वत्तेची महान मुरत,
बाबासाहेब आंबेडकर लाभले
स्वातंत्र्य,समता, बंधुता
बीज तयात पेरुन गेले..||

विश्र्वशांतीची घोषणा देणारे
आजवर ठरलो आम्हीच शहाणे…
लोकशाहीत घडलो आम्ही
संविधानाचे हेच ते देणे…||

राष्ट्राभिमान ऱ्हदयी जागवून
पाईक संविधानाचे बनून राहू
तिरंग्याचा डंका जगी नांदो
गीत समतेचे मिळून गाऊ…||

*हणमंत पडवळ*
*उस्मानाबाद.*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌐🔆🌐➿➿➿➿
*संविधान एक हक्क*

भारतीय संविधान आहे
देशवासीयांचा अभिमान
प्रजासत्ताक गणराज्यात
इथे लोकशाहीचा सन्मान

स्वातंत्र्याचा भक्कम आधार
धर्मनिरपेक्षता होते साकार
कायद्यापुढे सर्वच समान
हा मानवतेचा जयजयकार

संपूर्ण देशाची एकता
अबाधित राहील अखंडता
प्रत्येक व्यक्तीचा मान
हे भारतीय संविधान

संविधान एक हक्क
समतेची एकात्मतेची भेट
मानवतेची ही मिसाल
बंधुतेतून घडतो समेट

सार्वभौम समाजवाद
विविधतेत एकतेची साद
देशाचे एकेरी नागरिकत्व
संविधान कायद्याचे तत्व

*सौ अनुराधा भुरे,नांदेड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles