शनिवारीय काव्यस्तंभ चारोळी स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : संविधान एक हक्क*☄
*🍂शनिवार : २६ / नोव्हेंबर /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐आदर्श वाचक विजेत्यांचे प्रथमत: अभिनंदन*
➿➿➿➿🌐🔆🌐➿➿➿➿
*संविधान एक हक्क*

*संविधान एक हक्क दिला,*
*बाबासाहेबांनी आम्हा, जगण्यासाठी..,*
*”ह्या”हक्कांची अंमलबजावणी आज,*
*तेच नाहीत बघण्यासाठी..!*

*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*© सदस्य,मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🌐🔆🌐➿➿➿➿
*संविधान एक हक्क*

संविधान एक हक्क माझा
कर्तव्याचीही ठेवतो जाण
हक्कापेक्षा कर्तव्ये मोठी
देशाचा मज नित्य अभिमान…

*सौ. ललिता कोटे, डोंबिवली, ठाणे.*
*©️सदस्या :- मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🌐🔆🌐➿➿➿➿
*संविधान एक हक्क*

मतदानाचा हक्क,उच्च-नीच समानता
चुकीला शिक्षा, बंधनांची मुक्तता
दलितांचा उद्धार, लोकशाही अबाधितता
संविधान एक हक्क टिकवू एकात्मता .

*सौ.पूनम मनोज माळी,सांगली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌐🔆🌐➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*संविधान एक हक्क*

बाबासाहेब आंबेडकरांचे विचार
मानवाधिकार आयोग दिलं पक्कं
भारताला संविधान अर्पण केलयं
म्हणून झालं संविधान एक हक्क

*प्रतिभा खोब्रागडे*
अर्जुनी मोरगाव, गोंदिया
*©सदस्या मराठीचे शिलेदार*
➿➿➿➿🌐🔆🌐➿➿➿➿
*संविधान एक हक्क*

संविधान एक हक्क सर्वांचा
कर्तव्याची ठेवा जाण जरा…
अखंडीत राहण्या देश आपला
संविधानाचे नेहमी पालन करा

*श्री.बाळासाहेब रोहोकले*
मांडवे खुर्द,पारनेर,अहमदनगर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌐🔆🌐➿➿➿➿
*संविधान एक हक्क*

जीवनात असावे सदा तनमन सुंदर
प्रत्येकाला असावे स्वातंत्र्य आधार
संविधान एक हक्क हे अधिकार
निर्मळपणे स्विकार संविधान आदर

*श्री अशोक महादेव मोहिते*
बार्शी जिल्हा सोलापुर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌐🔆🌐➿➿➿➿
*संविधान एक हक्क*

ना कोणत्या धर्माने चालणार
ना जातीयवादाने चालणार
संविधान एक हक्क मानवी
तो फक्त कायद्याने चालणार

*मोहिनी निनावे*
आनंद नगर, नागपुर.
*©️ सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌐🔆🌐➿➿➿➿
*चारोळी- संविधान एक हक्क*

समता, बंधुता, स्वातंत्र्य
नांदते भारतात सौख्याने
संविधान एक हक्क मानवी
दिलंय माझ्या बाबासाहेबाने

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌐🔆🌐➿➿➿➿
*संविधान एक हक्क*

संविधान एक हक्क
न्याय सार्‍यांना समान
लाखात एक ग्रंथ भारी
संपूर्ण जगात महान.

*चव्हाण बी एम परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌐🔆🌐➿➿➿➿
*संविधान एक हक्क*

जळजळीत ठिणगी ती
करते जगास थक्क
असे मूल्यवान हे
संविधान एक हक्क…

*सौ सविता बन्सोड*
वानाडोंगरी,नागपूर.
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles