दक्षिण पश्चिम क्षेत्रात बसपातर्फे 73 वा भारतीय संविधान दिवस साजरा

दक्षिण पश्चिम क्षेत्रात बसपातर्फे 73 वा भारतीय संविधान दिवस साजरा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: भारतीय घटनेचे शिल्पकार प. पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. रामेश्वरी येथील बीएसपी कार्यालयात भारतीय संविधान दिनानिमित्त बहुजन समाज पार्टीचे वरिष्ठ कार्यकर्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराज भांगे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमात माजी जिल्हा महिला अध्यक्षा सुरेखाताई डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. बसपाचे कार्यकर्ते भालचंद जगताप यांनी यावेळी मार्गदर्शन केले. संविधानाची उद्देशिकाची सर्वसामुहिक शपथ घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. आपल्या भाषणात युवराज भांगे यांनी देशामध्ये एक वर्ग केवल याकरिता संविधानाचा विरोध करीत आहे. की, तो सर्वात अस्पृश्य समाजाच्या खालच्या व्यक्तीने लिहला गेला म्हणून आणि म्हणूनच धर्माच्या धर्मशास्त्राचे विरोधात हा संविधान आहे. मनुस्मृतीच्या कायद्यानुसार खालच्या दर्जाच्या अस्पृश्य व्यक्ती हा शिक्षण घेऊ शकत नाही तर या देशाचे कायदे बनवण्याचे अधिकार हे त्याला नाही. त्यामुळे आधीपासून उच्चवर्गीय लोक आजही भारतीय संविधानाचा विरोध करतात.

कायद्याची अंमलबजावणी पूर्णपणे होत नाही, कारण सरकारमध्ये प्रशासनामध्ये त्यांचेच माणसे बसलेली आहे. त्यामुळे एससी, एसटी, ओबीसी, आणि धार्मिक अल्पसंख्यांक मुस्लिम या समाजाला संविधानाच्या माध्यमातून न्याय मिळणे फार कठीण झाले आहे. आणि म्हणूनच जोपर्यंत हा बहुजन समाज एकत्र येणार नाही जोपर्यंत हा समाज आपल्या हक्क, अधिकार, या करिता जन आंदोलन करणार नाही, बसपाच्या बॅनरखाली येणार नाही तोपर्यंत यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येणार नाही. त्याकरिता सर्वांनी एकत्र येऊन मा.काशीरामजी च्या संघर्षाला आठवण रहिल. बहुजन समाजाची सत्ता देशात प्रस्थापित करावे आणि संविधानाचे संरक्षण करून संविधानाची अंमलबजावणी शंभर टक्के होणार असे उपद्देश भाषणात दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधानसभेचे अध्यक्ष ओपुल तामगाडगे यांनी केले. यावेळी कार्यक्रमात विधानसभेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

विधानसभा उपाध्यक्ष सुंदर भलावी, विशाल बनसोड विधानसभा महासचिव, नागेंद्र पाटील, रामबाग सेक्टर अध्यक्ष पंकज नाखले, सुरज पुराणिक, अश्विन पाटील, विकी वानखेडे, ज्योती गायकवाड, राजकन्या गायकवाड, उज्वला वानखेडे, ऋषी ढोलारे, विनोद नारनवरे, मयूर नगराडे, BVF रजत गोरकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे संचालन सुमित जांभुळकर यांनी तर आभार सुंदर भलावी यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles