तब्बल… १४ रूपयांनी कमी होणार पट्रोल व डिझेल

तब्बल… १४ रूपयांनी कमी होणार पट्रोल व डिझेलपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील जनता आधीच सत्तासंघर्ष, राजकारण, बेरोजगारी अशा एक ना अनेक कारणांनी सध्या जीवन जगत आहे. त्यातच इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे त्रासलेल्या जनतेला आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण कच्च्या तेलाच्या किमती घटल्याने पेट्रोल, डिझेलचा दर प्रति लिटर १४ रुपयांनी कमी होण्याचा अंदाज आहे. मे महिन्यानंतर प्रथमच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ८१ डॉलरवर आल्या आहेत. अमेरिकी क्रुड तेलाचा सरासरी भाव प्रति बॅरल ७४ डॉलर झाला आहे. कच्च्या तेलाच्या म्हणजे ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती भारतीय रिफायनरीसाठी सरासरी प्रति बॅरल ८२ डॉलरवर आल्या आहेत.

मार्चमध्ये त्याची किंमत प्रति बॅरल ११२.८ डॉलर होती. यानुसार, गेल्या आठ महिन्यात भारतीय रिफायनरी कंपन्यांसाठी कच्च्या तेलाच्या किमती ३१ डॉलरनी म्हणजेच जवळपास २७ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. प्रति बॅरल एक डॉलरची घट झाल्यास भारतीय कंपन्यांना लिटरमागे ४५ पैशांची बचत होते. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर प्रति लिटर १४ रुपयांनी कमी होऊ शकतात, मात्र ही कपाच एकाचवेळी होण्याची शक्यता नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

कच्च्या तेलाची किंमत,रुपयाच्या तुलनेत अमेरिकी डॉलरचा दर, केंद्र आणि राज्य सरकारद्वारे जमा केलेले कर आणि देशातील इंधनाची मागणी यावर देशातील पेट्रोल, डिझेलचे दर अवलंबून असतात. आपल्या देशात ८५ टक्के कच्चे तेल आयात केले जाते. २०१४ पासून तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात.

*महत्त्वाची कारणे*

चीनमध्ये कोरोना प्रतिबंधाचे नियम वाढवल्याच्या विरोधात सत्ताधारी सरकारविरुद्ध निदर्शने तीव्र झाली आहेत. तसेच प्रतिबंध असूनही रशियाचे तेल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध होत आहे आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढवल्याने जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग संथ झाला आहे, या महत्त्वाच्या कारणांमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती प्रति बॅरल ७० डॉलरच्या दिशेने जात आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील, मात्र त्याला थोडा वेळ लागेल. कारण तेल आयात केल्यापासून शुद्धीकरण करून बाजारात येईपर्यंत ३० दिवस लागतात. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यानंतर देशांतर्गत बाजारात पेट्रोल, डिझेल्या किमतींवर एका महिन्याने परिणाम दिसून येईल, असे पेट्रोलियम तज्ज्ञ नरेंद्र तनेजा यांनी म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles