ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन
पुणे : डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले (वय 74 ) यांचे अल्प आजाराने निधन झाले. ते ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
साठोत्तरी कालखंडात कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा अशा विविध वाङ्मयप्रकारांत त्यांनी दर्जेदार वाङ्मयनिर्मिती केली.
नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले यांचा जन्म मुखेड (जि. नांदेड) या गावी झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण देगलूर येथे झाले. बी.ए. आणि एम.ए. या दोन्ही परीक्षांत मराठवाडा विद्यापीठात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. कविता,कादंबरी,ललित गद्य आणि समीक्षा अशा विविध वाङ्मयप्रकारांत दर्जेदार लेखन कायम स्मरणात राहील.