बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : शीतलहर🥀*
*🍂बुधवार : ३०/ नोव्हेंबर /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*शीतलहर*

बाप हाकतो वखर
माय पेरते सपान
त्या रोपात पाहते
माय पोरीचे लगन

बैलाले टोचली तुतारी
कधी रक्त वाहे घळघळ
जशी पोराला मारली थापड
माझी माय करे हळहळ

वाटला शीतलहरीचा हेवा
सारे जमून शेकत होती
माय माझी तवा हुंदक्यात
आपली सपान जाळत होती

एकच गोधडी होती फाटकी
चार जणांचे आठ पाय
पांघरुण देई सर्वाले
थंडीत कुडकुडे माझी माय

आली शीतलहर जेव्हा
कधी पेटवली तिने शेकोटी
सरपनाचे ही लाकडे
सरण बनून पेटत होती

*डॉ. संजय भानुदास पाचभाई, नागपूर.*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🦚🔆➿➿➿➿
*शीतलहर*

बर्फवृष्टीतून झाला उगम,
आली ही शीतलहर…,
गोरगरिबांच्या जीवनात,
कालवून गेली,”थंड” जहर…!

थंडीने कुडकुडताना,
नव्हते कपडे उबदार…,
काकडून काकडून कुडकुडला,
“ह्या” परिस्थितीला,”हिच” जबाबदार…!

ओठ फुटले,
अंग तडकले….‌‌,
दात एकमेकांवर वाजताना,
कड कड कडकले….!

माणुसकीतला उबदारपणा,
शीतलहरीने गोठवला…,
हाडं गोठवणाऱ्या थंडीतून सूर्यानेही,
दरवाजा नाही ठोठवला….!

सारी कष्टकरी जनता,
वाट पाहे, जाण्याची शीतलहर..,
गरीबीत लाचारीनेही,
केला ठायी ठायी कहर…!!!

केला ठायी ठायी कहर…!!!

*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*© सदस्य,मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🔆🦚🔆➿➿➿➿
*शितलहर*

आली शितलहर
झाला थंडीचा कहर
रजई गरम वस्त्रे
काढा बाहेर लवकर

शेकोटी पेटली
तरी जाईना थंडी
कानटोपी घातली
वरून जाडजूड बंडी

ज्वारीचा मस्त हुरडा
मिरचीचा ठेचा
गरम गरम भाकरी
कोरड्यास झुणका

दुपार आली वर
तरी जाईना हुडहुडी
उन्हात किती बसावे
घरी रूसलाय गडी

गारठ्यात मस्तपैकी
गरम गरम खावे
पांघरून घेऊन
तूझ्या कुशीत निजावे

*सविता धमगाये, नागपूर*
जि. नागपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🦚🔆➿➿➿➿
*शीतलहर*

पहाटेच्या धुक्यात
गार गार गारव्यात
प्रेमाचा गुलाबी रंग
उडे मस्तीच्या तोऱ्यात

कोवळ्या कोवळ्या उन्हात
फुलपाखरू उडे रानात
दवबिंदूची पडती सडे
हिरव्या हिरव्या तृणात

विलोभनीय दृश्य निसर्गात
हुडहुडी भरे अंगाअंगात
पारिजातकाचे बहरणे
आनंद देई मनामनात

अंतरीक मनाच्या विश्वात
भावना इथे उसळतात
मन मोर पिसारा फुलता
धुके मखमली तरंगतात

काहूरले मन थंडीत
गजबज दाटली डोळ्यात
शीतलहर जाई स्पर्शुनी
आठवणीच्या हिंडोळ्यात

*कुशल गोविंदराव डरंगे, अमरावती*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🦚🔆➿➿➿➿
*शीतलहर*

मध्यावर्ती हिवाळा आला
सुरू झाली येणे शीतलहर
गार वारा वाहतच राहतोय
सकाळ संध्या दोन्हीं प्रहर

आरोग्यदायी वाटे हिवाळा
कोणासाठी असे त्रासदायक
सारासार विचार करता वाटे
ऋतू थंडीचा आल्हाददायक

आरोग्यवर्धक असे हिवाळा
आजारा देत नसतो सहारा
रुग्णालय गर्दी कमी दिसते
आरामात डॉक्टर वर्ग सारा

सुकामेवा पौष्टिक शरीराला
निरोगी ठेऊन वाढे मनोधैर्य
नव्या उम्मेदिने अन् जोमाने
येतसे जीवन जगण्या स्थैर्य

शेतकरी माझा बांधावरती
शेकोटी पेटवून शेक घेतो
रात्री अपरात्री झोप मोडून
पिक जोपसण्या पाणी देतो

शीतलहरी प्रमाणे माणसानं
शीतलता गुण अंगी बाणावा
तापड मर्जीचा,गरम रक्ताचा
अवगुण प्रसंगी दूर सारावा

*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🦚🔆➿➿➿
*शीतलहर*

ऋतू चक्र हाले डुले
एकामागुती चालले
ऊन पाऊस,हीव ते
एका वर्षात बांधले

उन्हाळ्यात ऊन्हाचे
पावसात पाण्याचे
हिवाळ्यात थंडगार
लोट वाहती हवेचे

आलीआली म्हणता
आलीच ही शीतलहर
हुडहुडी भरली अन्
झाला थंडीचा कहर

कानी शिरताना वारे
दंत कुडकुडती सारे
किती झाकता कांती
अंगा अंगात शहारे

ओष्ठ्य, उलले तळवे
तैले,सायीने माखले
कान नाक झाकूनि
उघडे लोचन राखले

पदी पायमोजे पूर्ण
तनू स्वेटर ऊबदार
शीरीटोप लोकरीचा
हातमोजे मऊशार

इतुके करुनी सायास
कुठे निघाली सवारी
कशी चुकवेल सांगा
नित्य सकाळची फेरी

पुन्हा येवून माघारा
शेकोटीत हात शेका
घेता चहा वाफाळता
आरामखुर्चीत टेका

घेवू काळजी थंडीत
दोन दिसांची लहर
संपुनिया जात पुन्हा
गुलाबी थंडीला बहर

*सौ.संगीता पांढरे*
*इंदापूर, पुणे*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🦚🔆➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे. (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*शीतलहर*

शीतलहर ही
नव शिरशिरी अंगी
येई झुळूक अन्
रोमांच उभे समोरी

शीतलहर ही
हवीहवीशी वाटते
श्रृंगारात सजून
लोकरीत सामावते

शीतलहरीत ही
उब नहाती
उबदार ज्वाला
अंगास लपेटती

शीतलहरी येती
संगे जाण मायेची
आठवण मग कोणा
आजी आईची

शीतलहरी स्पर्शता
स्वप्ने कोणाची
सांगू कशी आता
गाली लाली सख्याची

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🦚🔆➿➿➿➿
*शीतलहर*

चंद्रमोळीवर फिरे शीतलहर
पसरले चहुदिशा शुभ्रधुके
ठिगळं लावू असे कितीक
गोधळीला छत्तीस भोके

अंगात भरली हुळहुळी
शीतलहर शिरता घरात
झरोक्यास नाही झडपा
दरवाजा नाही हो दारात

पाऊसात तुटलं छप्पर
त्यातून शिरे गार वारं
कशी ऊब देऊ मायेची
काकुळतीला आली पोर

सरपण नाही रे घरात
पेटवू तरी कशी शेकोटी
जंगलात भिती जनावराची
फाॅरेस्टवाले करती दमदाटी

कसेबसे झाकतो देह
नशिबच सारे उसवलेले
चकवा देऊन जगतो
पण मन नाही हरलेले

झोपडीतून माझ्या जाऊ दे
आता देवा शीतलहर
पाठव तिला बंगल्यात
तिथेच येऊ दे तिला बहर

*सौ.रुपाली म्हस्के,मलोडे.गडचिरोली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔆🦚🔆➿➿➿➿
*शीतलहर*

आले थंडीचे दिवस जर
गरम कपडे हवे भरपूर
पहाटे बोबडी वळते तर
झोंबते हवा अंगा थंडगार

हळूहळू वाढलीशीतलहर
गरम कपडे प्रवासी जरुर
वृद्धांना मुलांना सांभाळा
एवढे महिने असे चार!

दवाखाना खर्च वाढणार
थंडीची काळजी घ्या तर
थोडा कमी त्रास होणार
सगळ्यांचे म्हणणे बरोबर

आजी आजोबा हे नकोच
थंडीत असे घरा बाहेर
घ्या काळजी त्यांची फार
थंडीचा महिना हा अखेर

वाढू लागली रे शीतलहर
कठीण हा थंडीचा प्रहर
करा संरक्षण स्वतः जरुर
दुर्लक्ष हे महाग पडणार !

बेतनार कधी हे जीवावर
नको उघडे हे दारासमोर
प्यायला पाणी कोमट तर
प्यावा चहा गरम चवदार

नाक कान डोळे हे सुंदर
वापरा बॉडी लोशन जरुर
थंडीची हुडहुडी अंगभर
आवडे मनास थोडीफार!

तोल मनाचा सावरला तर
आरोग्य उत्तम हे दमदार
वृद्धअन मुलांवर उपकार
जपावे थंडीत हे लवकर!

वाढली जर ही शीतलहर
उठा उशीरा हे थोडेफार
गरम चहापाणी प्या जरुर
थोडी औषधी ही घरोघर!

हात पाय मोजे उबदार
खेड्यात शेकोटी जरूर
थंडीत थकले जाते शरीर
अंगात उष्णता बरोबर!

शीतलहर नको अंगावर
अंग ओठ उलते भरपूर
व्हासलीन वापरा जरूर
काळजी घ्या वारंवार !

*श्री अशोक महादेव मोहिते*
बार्शी जिल्हा सोलापुर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆🦚🔆➿➿➿➿
*शीतलहर*

गौर तुझ्या कायेचा
गंध उधळला वनी
अंबरात उजळली
चांदरात ही दिवाणी

कुंजवनी राधा जणू
स्पर्शाठव ओढाळसे
चंद्रशिल्प सखी जणू
स्मरे मज वेल्हाळसे

धुंद मधुर रात्र-गात्र
मधुगंधित चाहुली
शीतलहर अंगांगाते
बहरते तनु वेली

चोच मिटुनी पंखांत
पाखरेही विसावली
पर्णांच्या कुशीत सखे
फुले हळूच पहुडली

चकोर होतसे अधिर
प्राशण्या चांदणथेंब
सांद्र नयनी पाहशील
तुझेच गं नितळ बिंब

*रचनाः वृंदा(चित्रा)करमरकर.*
सांगली जिल्हाः सांगली.
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह.*
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles