आभारीय मनोगत;चंदू डोंगरवार

➿➿➿➿💐🌈💐➿➿➿➿
*आभारीय मनोगत;चंदू डोंगरवार*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

➿➿➿➿💐🌈💐➿➿➿➿
*आठवडाभरात चार दिवस (रविवार ते बुधवार) माझी समुहातील विषयावर लिहीण्याची संधी हुकली याबद्दल क्षमस्व..!एखाद्या विषयावर आवड निर्माण झाली कि, प्रामाणिक राहणे त्या छंदाची जोपासना करणे आणि ते अविरत पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येक ध्येय वेड्यासारखे असते..!*

*या आठवड्यात चूकभूल, सत्यशोधक फुले ,जगणं मरणं, शितलहर असे अत्यंत समर्पक आणि विचारांना चालना देणारे विषय मराठीचे शिलेदार समुहात देण्यात आले. त्याप्रमाणे यातील लिखाणाचे माध्यमातून बहुतेकांनी संधीचे सोने केले. मला मात्र वेळेअभावी व माझ्या काही वैयक्तिक अडचणीमुळे सहभाग नोंदवता आला नाही..! याची उणीव मनात कायम राहिल. बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेत सहभागी झालेले मान्यवरांनी चारोळी, चित्र चारोळी व काव्यरचना या तिन्ही प्रकारात खुप चांगले लिखाण केले आहे.*

*सध्या देशातील वातावरण , मैत्री प्रेमातील चौकटीबाह्य नाते आणि माणुसकीला काळीमा फासणा-या या ह्रदयद्रावक घडणाऱ्या घटना यांना अनुसरून नव्हे तर नैमित्तिक दिलेले समुहातील विषय व त्यावरील द्रुष्टीक्षेप यांना सांगड घालून सविताताई यांनी या लिखाणाचे परिक्षणीय लेख अभ्यास व चिंतन करुन साजेसे त्यांच्या उत्तम अशा लेखणीतून आम्हा आदर्श वाचकांना उपलब्ध करुन दिलेले आहे..हे वाचकांचे भाग्यच म्हणावे लागेल.. आणि ते आपण वाचून घेतले आहे. याचा आनंद मिळतो.*

*मुख्य परीक्षक सविता ताई म्हणजे आम्हाला लाभलेले एक उत्तम वक्ते आणि मार्गदर्शनासोबतच उत्कृष्ट लेखिका आहेत हे सर्वांना माहीत आहे… माझ्या सारख्या नवोदित सदस्याने लिहीलेले त्यांच्या विषयी प्रतिक्रियात्मक हे अल्पसे मनोगतीय शब्द कुणाला अतिशयोक्ती वाटू नये..! आ. सविताताईच्या लेखणीला खुप खुप शुभेच्छा..!ताईंचे मार्गदर्शन कायम आम्हाला लाभत राहिल हिच अपेक्षा… आपल्या सुंदर लिखाणाबद्दल अभिनंदन ताई…! 💐*
➿➿➿➿💐🌈💐➿➿➿➿
*✍️चंदू डोंगरवार*
अर्जुनी मोर, जिल्हा गोंदिया.
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐🌈💐➿➿➿➿

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles