लेट पण…. थेट काळजातून; संग्राम कुमठेकर

➿➿➿➿🌈🙏🌈➿➿➿➿
*✍️लेट पण…. थेट काळजातून*
➿➿➿➿🌈🙏🌈➿➿➿➿
*🚩सर्वप्रथम मराठीचे शिलेदार समूहाचे मुख्य प्रशासक राहुलदादा पाटील, सचिव पल्लवीताई, विश्वस्त अशोकदादा लांडगे, अरविंददादा उरकुडे यांचे मनःपूर्वक धन्यवाद मानतो. कारण या सर्वांनी मुख्य आयोजक म्हणून माझ्यावर विश्वास टाकला व विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून शक्य तेवढे करण्याचा प्रयत्न मी केलाय आणि त्याचे दृश्य रूप म्हणजे ३ नोव्हेंबर २०२२ रोजी भालचंद्र ब्लड बॕक ,लातूर येथे पार पडलेला भव्यदिव्य “साहित्यगंध दीपोत्सव २०२२” दिवाळी विशेषांक प्रकाशन ,विविध पुरस्कार वितरण व कवीसंमेलन सोहळा होय.*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*हा कार्यक्रम झाल्यापासून खूप लिहावं…मन मोकळं करावं वाटत होतं. परंतु येरझारा मारून जीव मेटाकुटीला आलेला. इच्छा असूनही लिहिता आलं नाही…अनेकांनी कार्यक्रमाबाबत आपली हृदयस्पर्शी मनोगते मांडली…मन लावून वाचायचो. परंतु सविस्तर प्रतिक्रिया पण देऊ शकलो नाही .मनाला हे शल्य सारखं बोचत होतं तरीही मनात कुठंतरी विश्वास होता की माझ्या शिलेदार परिवारातील ताई दादा मला समजून घेतील. असो घाई गरबडीत, व्यस्ततेमुळे लातूरला येणाऱ्या शिलेदारांची गैरसोय झाली असेल तर त्याबद्दल मनापासून दिलगीरी व्यक्त करतो. मला हाही विश्वास आहे की माझ्या चुका पोटात घालून सर्वजण माफ करतीलच.*

क्षण मोहरलेले खास
रोखून श्वास पाहिले
सर्वोत्कृष्ट सन्मानाने
शब्दफुले मी वाहिले

*🙏राहुलदादा म्हणजे आनंदाची उधळण करून प्रहावित राहणारा खळाळता झराच. कितीही संकटे, समस्या आल्या तरीही न डगमगता वाटेतील दगडांना वळसा घालून वाट काढायची व अविरत सुखद क्षणांनी जीवनात रंग भरायचा एवढंच यांना माहिती. परंतु दुसऱ्यांच्या जीवनात रंग भरताना स्वतःच्या जीवनाचा बेरंग होतो याकडे साफ दुर्लक्ष आणि असं का दादा म्हणून विचारलं तर याची मला सवय आहे. तुम्ही ताण घेऊ नका. म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणारे दादा. यासाठी सांगतोय चार दिवसापूर्वीच दादांनी “निःशुल्क कवीसंमेलन” ची लिंक टाकली.वाचून आश्चर्याचा धक्काच. कारण कार्यक्रम घ्यायचा म्हटलं की काय काय खटाटोप करावा लागतो हे नुकतंच मी अनुभवलेलं.*

*🔆एक गुपीत सांगू का ,लातूरला प्रकाशित झालेला “साहित्यगंध दीपोत्सव” विशेषांक पुर्णत्वास नेण्यासाठी दादांना स्वतःची मोटरसायकल विकावी लागली तरीपण आता निःशुल्क कवीसंमेलन…दादांना हे आवडणारही नाही. कारण तशी तंबीच दिलीय की गाडीचे कुणालाही सांगू नका. परंतु माझं मन मला स्वस्थही बसू देईना. प्रकाशनाचा, पुरस्काराचा कार्यक्रम घ्यायचा म्हटलं की दोन महिने तरी लागतात तयारीला. परंतु आपले काही साहित्यिक ताई दादा शेवटच्या काही दिवसांत नोंदणी करतात ,नियोजन पूर्ण झाल्यावर त्यामुळे ऐनवेळी धावपळ होते. सूचना टाकूनही सुरूवातीला नोंदणी अत्यल्प… विशेषांक तर काढायचा…पुरस्कार वितरण ..कार्यक्रमाचा मुख्य उद्देश …दादांनी तुम्ही काळजी करू नका मी पाहतो विशेषांकाचे …तुम्ही नोंदणीचे पहा…पुरस्कार्थी निवडा…प्रमुख अतिथी ठरवा…आणि दोनच दिवसात फोन …संग्राम सर …विशेषांकाची पूर्ण तयारी झाली…आता तुम्ही ताण घेऊ नका…मी म्हटलं..कसं काय ? ..कोणी प्रायोजक भेटला की काय ? तर दादा म्हणाले…नाही ना…मग मी म्हणालो काय केलं ? ..ते सहजच म्हणाले ..माझी नवी गाडी २५ हजारात विकली.२० हजाराची कागद खरेदी ..बाकीचे मुख्य पाहुण्यांच्या शाल ,ट्राफी, मानपत्र…मी गोंधळून गेलो …काय म्हणावं या समर्पण वृत्तीला…तरीही म्हणालो दादा तुम्ही गाडी विकायला नको होती…मग काय करणार ? हा त्यांचा प्रतीप्रश्न बरंच काही सांगून गेला नि मी निःशब्दच झालो.*

*🌸म्हणून शिलेदारांना ऐवढेच सांगू इच्छितो की खूप दिवस आहेत,वेळ आहे,करू नोंदणी …असं न करता..यायचंय ना मग नोंदणी करून सर्व पूर्तता करावी…त्यामुळे नियोजन उत्कृष्ट करता येईल.निःशुल्क कवीसंमेलनाची लिंक टाकलीय तर पटकन सहभागी व्हा म्हणजे अचूक अंदाज लावता येतो.अजून खूप काही बोलाचंय पण थांबतोच.*

*🌸 “क्षण मोहरलेले” सर्वोत्कृष्ट रचना व अप्रतिम पोस्टर, “स्वप्न विकतो आम्ही” “चाहूल थंडीची” “काजव्याच्या राती” “संविधान एक हक्क” या माझ्या रचनांना सर्वोत्तम १५ मध्ये स्थान देऊन सन्मानित केले तसेच साहित्यगंध साप्ताहिकाच्या ६१/६२/६३ अंकामध्ये अनुक्रमे “मुक्तीपथ” “एकात्मता” “कागदी नाव” या रचना प्रसिद्ध केल्या व सर्वोत्कृष्ट हायकूने सन्मानित केले त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. 🙏🙏🙏*

*💟लातूरला यावंच लागेल कार्यक्रमाला…म्हणून हक्कानं फोन केला…माझ्या विनंतीला मान देऊन बहुतांश ताई दादा आले.आपल्या या विश्वासामुळे, जिव्हाळ्यामुळं,प्रेमामुळे मी अगदी भारावून गेलोय. माझी थोरली बहीण वैशूताई,धाकटी बहिणा सवूताई,सुधाताई,स्वातीताई, तारकाताई,सुधाकरदादा, अरविंददादा यांच्या घरच्या अडचणी असतानासुद्धा या संग्रामदादासाठी धावून आल्या…अनेकांनी आपल्या अडचणी मला सांगितल्या पण मी त्यातून मार्ग काढा व लातूरला या असे म्हटले व ते सर्वजण आले.लातूर नगरीतील या कार्यक्रमाला शब्दप्रभू ताई दादांच्या उपस्थितीमुळे शोभा आली.त्या सर्व ताई दादांचा शतशः मी ऋणी आहे. यापुढेही अशीच साथ द्याल अशी अपेक्षा .*

लेट पण थेट काळजातून
हार्दिक मांडतो मी आभार
सदैव लाभो मला हृदयातून
प्रेम, जिव्हाळा नको पुष्पहार

➿➿➿➿🌈🙏🌈➿➿➿➿
✍️ *श्री.संग्राम कुमठेकर*
*मु.पो.कुमठा (बु.)*
*ता.अहमदपूर जि.लातूर*
*सहप्रशासक/परीक्षक/संकलक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌈🙏🌈➿➿➿➿

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles