गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🌤️विषय : माती🌤️*
*🔹गुरूवार : ०१ / १२ /२०२२*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*माती*

काळी माती आमुची माय
तीच आम्हाला तारते
हिरव्यागार पिकातून
जणू मोती उगवते….

*सौ. ललिता कोटे, डोंबिवली, ठाणे.*
*©️सदस्या :- मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🌈☄️🌈➿➿➿➿
*माती*

मातीतूनच उगवते
हिरव सोनं
फिटणार नाही कधीच
तिचे हे ऋण

*सौ.प्रांजली जोशी ,विरार ,पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌈☄️🌈➿➿➿➿
*माती*

माती माझ्या देशाची
कपाळी लावून टिळा
नाती,धर्म ,माणूसकी
उभा राहिला आकाशी निळा…

*शिवाजी नामपल्ले ,अहमदपूर जि.लातूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🌈☄️🌈➿➿➿➿
*माती*

कशी म्हणू तूला माती
तू तर आहेस जीवनदाती
उजवतेस कुस आणि देते
नवांकुराना पोषणाची गती

*सविता धमगाये नागपूर*
जि. नागपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌈☄️🌈➿➿➿➿
*माती*

जीव सजीवांच्या अस्तित्वासाठी
जमिनीतून पिकतात माणिकमोती,
सर्व गरजांची मनोमन पूर्तता करते
सार्वकालीन कृतज्ञतेची अमूल्य माती.

*दिनकर श्रीपती पाटील*
नाधवडे जि सिंधुदुर्ग
*©️सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌈☄️🌈➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना २.३० पर्यंत पाठवावे. (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
*माती*

मातीचा एक दिवा मिणमिणता
होतो संपूर्ण घरात प्रकाशमान
तेलवात लावा सान पणतीमधे
दिवाळीत माती पणतीला मान…

*वसुधा नाईक,पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌈☄️🌈➿➿➿➿
*माती….*

बहु आहेत चालीरीती,
आहेत विविध जातीपाती
परी समता आम्हां शिकविती,
माझ्या देशाची माती….

*फुलवरे चंद्रकांत खेमाजी*
जि.हिंगोली
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌈☄️🌈➿➿➿➿
*माती*

जवानांना प्रिय धरती
सीमेचे रक्षण करती
शेतकऱ्यांची भूमाता आवडती
मातीत पिकवी हिरेमोती

*सुनीता पाटील*
जिल्हा अहमदनगर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌈☄️🌈➿➿➿➿
*चित्र चारोळी- माती*

स्वर्गा हूनही सुंदर भासे
मज मातृभूमीची माती..
अवीट गोडी तिची मजला
अतुट आमुची नाती…

*सौ संगीता देशमुख*
*बारामती, पुणे*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌈☄️🌈➿➿➿➿
*माती*

तू पाऊस होशील तर मी होईल हिरवं रान
ये पुन्हा बरसून दे मजला तू हिरवाईचं दान
मी माती धरून ठेवते ओलावा सर्वांसाठी
मीच देते अंकुर नी माझ्यातच निसर्गाची खान

*मोहिनी निनावे*
आनंद नगर,नागपूर.
*©️ सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌈☄️🌈➿➿➿➿
*माती*

सोनं उगवणारी माती आपली
-हास हिचा आपण थांबवू
आरोग्यदायक अन्न निर्माण करण्यास
आरोग्यदायी मातीचे संरक्षण करू

*सौ.पूनम मनोज माळी,सांगली*
*©सदस्या-मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌈☄️🌈➿➿➿➿
*माती*

या नश्वर देहाचा
किती करशील अभिमान
झालाय मातीतून निर्माण
मातीतच जाणार

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌈☄️🌈➿➿➿➿
*माती….*

जन्म तुझा मानवा माती चा,
मातीतच तू क्षय पावशील
का उगा व्यर्थ गर्वाने फुलतोस
अ रे सारेच इथे ठेवून जाशील.

*सौ.सविता वामन ठाणे.*
सदस्या कवियत्री लेखिका.
*©मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🌈☄️🌈➿➿➿➿
*माती*

काळी *माती* शेतकऱ्याची
आन ,बान अन् शान
घाम गाळून शेतकरी पिकवीतो
टपोऱ्या मोत्यावाणी धान.

*शैला शिंदे*
*निरा ता पुरंदर जि पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌈☄️🌈➿➿➿➿
*माती*

फेडू कसे उपकार ?
अमूल्य आहे माती !
तुझ्याच उदरातून
पिकते मानिकमोती !

*प्रा. दिनकर झाडे, गडचांदूर*
जि. चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles